नोकरी सोडून गुहेत वास्तव्य
विवाह करण्यास दिला नकार
चीनमध्ये 35 वर्षांचा एक इसम नोकरी आणि विवाह यासारख्या अवधारणांना निरर्थक मानतो आणि सर्वकाही सोडून तो मागील 4 वर्षांपासून गुहेत राहतोय. दक्षिण-पश्चिम चीनच्या सिचुआन प्रांताच्या मिन हेंगकाई येथील एका एअरकंडिशन गुहेला तो स्वत:चे घर ठरवितो. 2021 च्या अखेरीस त्याने राइड-हेलिंग ड्रायव्हरची नोकरी सोडली, या नोकरीत त्याला दरमहिन्याला 10 हजार युआन इतका पगार होता, मग तो शहराच्या धावपळीपासून दूर एकांत जीवन जगण्यासाठी स्वत:च्या गावी परतला आणि तेथेही तो एका गुहेत राहण्यास निघून गेला.
नोकरी करणे वाटते निरर्थक
मिन नावाच्या या इसमाला नोकरी करणे निरर्थक वाटते. यापूर्वी त्याने नातेवाईकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी दिवसा 10 तास काम केले होते. मला अद्याप बँक आणि कर्ज देणाऱ्या कंपन्यांचे 3 लाख युआनचे कर्ज शिल्लक असल्याचे तो सांगतो.
कर्जफेड शिल्लक
मिनने कर्ज फेडण्याची अपेक्षाच सोडून दिली आडहे. माझ्या नातेवाईकांनी माझ्या संपत्ती विकल्या आहेत, ज्याचा वापर कर्ज फेडण्यासाठी केला जाऊ शकत होता. स्वतच्या जमिनीची एका सहकारी ग्रामस्याच्या जमिनीशी अदलाबदल केली आहे. यामुळे मला शेजारच्या गुहेचा वापर करता येणार असल्याचे मिनने सांगितले.
50 चौरस मीटरची गुहा
मिनने 50 चौरस मिटरच्या गुहेत स्वत:चे घर निर्माण करण्यासाठी 40 हजार युआन खर्च केले आहेत. मिन दररोज सकाळी 8 वाजता उठतो आणि पूर्ण दिवस वाचन, हिंडणे आणि शेतात काम करण्यात घालवितो. तो रात्री 10 वाजता झोपतो आणि स्वत:च्या शेतातील भाज्या खात असतो.
अशाचप्रकारच्या जीवनाचे स्वप्न
मी केवळ दैनंदिन आवश्यकतांवरच पैसे खर्च करतो. शहरात काम करताना मी याच जीवनशैलीचे स्वप्न पाहिले होते असे तो सांगतो. सोशल मीडियावर तो स्वत:च्या जीवनाविषयी पोस्ट करतो. त्याचे 40 हजार फॉलोअर्सन असून तो लाइव्ह-स्ट्रीमिंगद्वारे कमाई करू शकतो.
गुहेला ब्लॅक होल नाव
मिनने स्वत:च्या गुहेला ब्लॅक होल नाव दिले आहे. मी स्वत:च्या तुच्छतेची जाणीव स्वत:ला करवून देऊ इच्छित होतो. विवाहाला मी वेळ अन् पैशांची नासाडी मानत असल्याचे ते करण्याची माझी इच्छा नाही. खरं प्रेम मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. मी इतक्या दुर्लभ गोष्टीसाठी मेहनत का करू असे तो म्हणतो. चिनी सोशल मीडियावर काही लोकांना मिनचा अर्थ तांग पिंग असल्याची टिप्पणी केली आहे. हा एक चिनी शब्द असून याचा अर्थ केवळ इतकीच कृती करायची की काम होईल असा आहे.