अमेरिकेतील क्वीन ऑफ डूम्सडे
वर्षभरासाठीच्या सामग्रीचा साठा : 5 वर्षांचा राखणार भांडार
वाईट वेळ सांगून येत नाही, याचमुळे आम्हाला त्यासाठी पूर्वीच तयारी करावी लागते. परंतु अमेरिकेतील एका महिलेने तयारीच्या नावावर इतके काही करून ठेवले आहे की लोक तिला मूर्खात काढत आहेत. ही महिला युद्ध किंवा प्रलयासाठी तयारीला लागली आहे. यामुळे ती वर्षभरासाठीचे अन्नधान्य जमवत आहे, आता 5 वर्षांचा भांडार स्वत:च्या घरात करून ठेवण्याचे तिचे लक्ष्य आहे.
जगात कुठल्याही आपत्ती किंवा अनपेक्षित परिस्थितीसाठी लोक वेगवेगळ्या प्रकारे तयारी करतात. परंतु अमेरिकेतील एक महिला स्वत:ला ‘क्वीन ऑफ डूम्सडे’ म्हणवून घेते, कारण तिने स्वत:च्या परिवाराच्या 5 सदस्यांसाठी पूर्ण एक वर्षाचा खाद्यभांडार पूर्वीच तयार ठेवला आहे. 37 वर्षीय क्रिस्टल फ्रूगल ही यूटाची रहिवासी असून ती लहानपणापासून खाण्यापिण्याच्या गोष्टी संरक्षित करण्याची कला शिकत आहे. तिने केवळ वयाच्या चौथ्या वर्षापासून कॅनिंग आणि प्रिझर्व्हेशनचे काम सुरू केले होते. आता ती स्वत:चा पती (41 वर्षे) आणि तीन मुलांसोबत (13, 12 आणि 8 वर्षे) असे जीवन जगत आहे, ज्यात कुठलीही आणीबाणी किंवा आपत्तीच्या काळात तिला बाहेरून भोजनाची गरज भासणार नाही.
प्रलय झाल्यास...
क्रिस्टलच्या घरामागे एक मोठे उद्यान असून तेथे बटाटे, टोमॅटो, मिरची, भोपळा, सफरचंद आणि अनेक प्रकारच्या फळभाज्या ती उगविते. दरवर्षी सुमारे 800 पाउंड (जवळपास 360 किलो) फळे आणि भाज्या उगवत असल्याचा तिचा दावा आहे. याचबरोबर ती स्थानिक शेतकऱ्यांकडून मांसही खरेदी करते आणि दरवर्षी मांस संग्रहित करत पूर्ण वर्षासाठी राखते. क्रिस्टलकडे केवळ ताजे खाद्यपदार्थच नव्हे तर असाही खाद्यभांडार आहे, जो 25 वर्षांपर्यंत सुरक्षित राहू शकतो. यात रिब-आय स्टेक्स, मॅकरोनी-चीज, चिकन नगेट्स आणि पंपकिन पाई यासारखे खाद्यपदार्थ सामील आहेत. ती सातत्याने स्वत:च्या पँट्रीला रोटेट करत राहते म्हणजेच जुन्या सामग्रीचा वापर करत नव्या सामग्रीचा साठा करत राहते.
50 हजार रुपयांची दर महिन्याला सामग्री
आम्ही राजकारणासाठी तयारी करत नाही, तर जीवनाच्या अनिश्चिततांसाठी करतो. चार वर्षांपूर्वी पुरवठासाखळी विस्कळीत होत महागाई वाढली होती, त्यावेळी आमच्याकडे सर्वकाही पूर्वीपासूनच होते. प्रेपिंग म्हणजेच अंतरिम तयारी केवळ जग संपण्याच्या भीतीमुळे नव्हे तर दैनंदिन जीवनाच्या आव्हानांसाठी असावे असे तिचे सांगणे आहे. क्रिस्टलच्या आजीआजोबांनी (एडेल, 76 आणि क्लाइड 92 वर्षे) तिला बालपणी उद्यानकाम आणि खाद्यसामग्री संरक्षित करण्याची कला शिकविली होती. मी 30 वर्षांपासून कॅनिंग करत आहे आणि इतक्या वर्षांमध्ये मला केवळ तीन जार फेकावे लागले आहेत असे ती सांगते. क्रिस्टल दर महिन्याला सुमारे 600 डॉलर्स (जवळपास 50 हजार रुपये) अशा गोष्टींवर खर्च करते, जी ती स्वत: उगवू शकत नाही. परंतु हा खर्च देखील दीर्घकाळात बचत करवितो असे तिचे सांगणे आहे.
5 वर्षांची करतेय तयारी
जेव्हा मी बाजारात जाते आणि पास्ता ऑफरमध्ये पाहते, तेव्हा मी आणखी दोन खरेदी करते, हळूहळु असे करत माझ्याकडे 6 महिन्यांचा स्टॉक होतो, यामुळे मी महागाईपासून वाचते आणि पैसेही वाचवू शकते असे तिचे सांगणे आहे. सद्यकाळात क्रिस्टलकडे एक वर्षाचा खाद्यभांडार आहे, परंतु तिचे लक्ष्य 5 वर्षांपर्यंतचा भांडार तयार करणे आहे. सुरुवात कमीतकमी दोन आठवड्यांच्या खाद्य आणि पाण्याच्या भांडारापासून करण्यात यावी आणि मग हे प्रमाण हळूहळू वर्षापर्यंत वाढविण्यात यावे आणि मग त्याला आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला क्रिस्टल लोकांना देत आहे.