चौगुले चषक क्रिकेट स्पर्धा : सेंट पॉल्स, केएलई संघ विजयी
बेळगाव : आंनद क्रिकेट अकादमी आयोजीत चौगुले चषक 14 वर्षाखालील आंतर शालेय क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून केएलईने सेंट मेरीजचा 22 धावांनी. तर सेंट पॉल्सने सेंट झेवियर्सचा 26 धवांनी पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. अथर्व करडी (सेंट पॉल्स), कलस बेन्नकेट्टी (केएलई), याना सामनावीर देण्यात आले. भुतरामट्टी येथील भगवान महावीर मैदानावर खेळविण्यात आलेलया पहिल्या सामन्यात सेंट पॉल्स प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गटीबाद 113 धावा केल्या. त्यात साईराज सक्रीने 37, अथर्व करडीने 16 धावा केल्या. सेंट झेवियर्स तर्फे आरूष काळभैरव व इंद्रप्रजापती यांनी प्रत्येकी 2 गडीबाद केले. प्रत्युतरादाखल खेळताना सेंट झेवियर्सने 20 षटकात 4 गडीबाद 87 धावाच केल्या. त्यात अनुशगौडा पाटीलने 29, आरूष काळभैरवने 26 धावा केल्या. सेंटपॉल्स तर्फे अथर्व करडी व साईराज सक्री यांनी प्रत्येकी 1 गडीबाद केले. दुसऱ्या सामन्यात केएलईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडीबाद 108 धावा केल्या.त्यात कलश बेनकट्टीने 36, मोहमद हमजाने 19 धावा केल्या. पद्दोत विरगौडर व स्वराज्य जुवेकर यांनी प्रत्येकी 1 गडीबाद केले. प्रत्युतरादाखल खेळताना सेंट मेलीजने 20 षटकात 6 गडीबाद 86 धावाच केल्या. त्यात समर्थ कुरबरने 37, पृथ्वी नाईकने 10 धावा केल्या. केएलई तर्फे सय्यद अबरारने 2 तर कलश बेनकट्टीने 1 गडीबाद केला.