महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पॅन कार्डवर आता क्यू आर कोड

11:29 AM Nov 27, 2024 IST | Pooja Marathe
QR code now on PAN card
Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय

Advertisement

प्रकल्पासाठी सरकारद्वारे 1435 कोटी रुपयेंची तरतूद

Advertisement

कोल्हापूरः सुरेश पाटील

करदात्यांच्या ओळखीसाठी जारी केलेले पॅन कार्ड आता क्यू आर कोडसह जारी केले जाणार आहे. जेणेकरुन करदात्यांच्या डिजिटल अनुभवामध्ये वाढ होण्यास मदत होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारावरील कॅबिनेट समितीने (CCEA) PAN 2.0 प्रकल्प सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामागे सरकारचा उद्देश सरकारी संस्थांच्या सर्व डिजिटल प्रणालींमध्ये पॅनचा मुख्य ओळखकर्ता म्हणून वापर करण्याचा आहे. या प्रकल्पासाठी सरकारद्वारे एकूण 1435 कोटी रुपये खर्चाची तरतूद केली जाणार आहे.

पॅन 2.0 मध्ये विशेष काय?

1) डिजिटल सिक्युरिटीचे अपग्रेड PAN 2.0 चा मुख्य उद्देश डिजिटल सुरक्षा मजबूत करण्याचा आहे. जेणेकरून फसवणूक आणि डेटा चोरीची शक्यता कमी होईल.

2) ई-पॅन अनिवार्यपॅन कार्ड PAN 2.0 प्रणालीमध्ये डिजिटल केले जाईल, ज्यामध्ये ई-पॅनचा वापर प्रामुख्याने केला जाईल. ही प्रणाली पेपरलेस असेल आणि तुम्हाला लगेच पॅन क्रमांक दिला जाईल.

3) फिनटेक आणि बँकिंगसाठी सुलभ इंटरफेसहे सर्व बँकिंग आणि वित्तीय सेवांसाठी एक मजबूत आणि सुलभ इंटरफेस बनेल. आता पॅनला आधारशी लिंक करण्यासोबतच इतर आर्थिक डेटाही एकत्रित केला जाईल. सध्या देशात सुमारे 78 कोटी पॅन जारी करण्यात आले आहेत. त्यापैकी 98 % पॅनचा वैयक्तिक स्तरावर वापर केला जातो. या प्रकल्पाचे उद्दिष्ट प्रवेश सुलभतेसह आणि जलद सेवा वितरणासह अधिक दर्जेदार प्रदान करण्याचा असून हा प्रकल्प करदात्यांच्या चांगल्या डिजिटल अनुभवासाठी PAN/TAN सेवेच्या तंत्रज्ञान-आधारित परिवर्तनाद्वारे करदात्यांच्या नोंदणी सेवेच्या व्यवसाय प्रक्रियेची पुनर्रचना करण्यासाठी एक ई-गव्हर्नन्स प्रकल्प आहे.

सरकारच्या विधानानुसार, हे विद्यमान PAN/TAN 1.0 इकोसिस्टमचे अपडेटेड व्हर्जन असेल. क्यूआर कोडसह पॅन विनामूल्य जारी होणार आहे. पॅन 2.0 प्रकल्प तंत्रज्ञानाद्वारे करदात्यांच्या नोंदणी सेवांमध्ये मोठा बदल घडवून आणण्यास मदत करेल. करदात्यांना अनेक प्रकारचे फायदे मिळतील ज्यामध्ये सेवा सहज मिळू शकतील तसेच सेवांची डिलिव्हरी जलद करता येईल, दर्जा सुधारेल, सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होईल, डेटा सुरक्षित राहील, पर्यावरणपूरक प्रक्रियेमुळे खर्च कमी होण्यास मदत होईल.
याशिवाय सरकारी एजन्सीजच्या डिजिटल सिस्टीमसाठी पॅनचा वापर सामान्य ओळखकर्ता म्हणून केला जाईल. जो सरकारच्या डिजिटल इंडिया व्हिजनशी सुसंगत आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पॅन 2.0 प्रकल्पांतर्गत करदात्यांना कोड असलेले नवीन पॅन कार्ड मोफत दिले जाईल.

विद्यमान पॅनकार्ड धारकांसाठी काय बदल होणार?

जुन्या पॅन कार्डधारकांना कोणताही नवीन अर्ज किंवा प्रक्रिया पूर्ण करावी लागणार नाही.

तुमचा विद्यमान पॅन स्वयंचलितपणे अपग्रेड होईल.

Advertisement
Next Article