पुतिन यांच्याकडून अझरबैजनची क्षमायाचना
वृत्तसंस्था / मॉस्को
अझरबैजानचे एक प्रवासी विमान कझाकस्तानमध्ये कोसळल्याच्या प्रकरणी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी अझरबैजानची क्षमायाचना केली आहे. रशियाच्या क्षेपणास्त्रामुळे हे विमान कोसळले होते. प्रथम तो अपघात होता असे वृत्त प्रसारित झाले होते. तथापि, नंतर रशियाच्या क्षेपणास्त्रामुळे ते कोसळल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, रशियाने हेतुपुरस्सर ही कारवाई केली नव्हती. केवळ अपघाताने क्षेपणास्त्राची दिशा चुकल्याने क्षेपणास्त्र विमानावर आदळले असे स्पष्टीकरण रशियाने दिले होते. अझरबैजानने या प्रकाराचा निषेध करत रशियाशी असणारी विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घोषित केला होता. याच संदर्भात आता रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी अझरबैजानची क्षमायाचना केली आहे. तथापि, अद्याप अझरबैजानने रशियाच्या क्षमायाचनेवर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न केल्याने तणाव कायम आहे.