मशीनमध्ये पैसे टाका, बुलेट्स मिळवा
अमेरिकेत दूध अन् अंड्यांप्रमाणे बंदुकीच्या गोळ्या खरेदी करा
अमेरिकेत गन वायलेंसच्या घटना जगातील अन्य कुठल्याही देशाच्या तुलनेत सर्वाधिक असतात. तरीही अमेरिकेच्या शहरांमध्ये दूध आणि अंड्यांप्रमाणे बंदुकीच्या गोळ्या सहजपणे खरेदी करता येणार आहेत. याकरता रितसर अनेक ग्रोसरी स्टोअर्समध्ये वेंडिंग मशीन्स लावण्यात आल्या आहेत. या मशीन्सद्वारे तुम्ही कुठल्याही समयी सहजपणे बंदुकीच्या गोळ्या खरेदी करू शकता.
अमेरिकेच्या अलाबामापासून ओक्लाहोमा आणि टेक्सासच्या ग्रोसरी स्टोअरमध्ये बुलेट्स खरेदी करण्यासाठी दूधाच्या वेंडिंग मशीन्सच्या बाजूला बंदुकीच्या गोळ्या असलेली वेंडिंग मशीन पाहू शकता. सध्या या वेंडिंग मशीन्स ओक्लाहोमा, टेक्सास आणि अलाबामा या तीन ठिकाणच्या किराणा दुकानात दिसून येतील. त्यांना एटीएमप्रमाणे सहजपणे वापरता येते.
अमेरिकेत राउंड्स नावाच्या कंपनीने या वेंडिंग मशीन्स ग्रोसरी स्टोअर्समध्ये लावण्याचे काम
हाती घेतले आहे. या मशीन्समध्ये एक आयडेंटिफिकेशन स्कॅनर आणि फेशियल रिकग्निशर सॉफ्टवेअर असून ते खरेदीदाराच्या वयाची पडताळणी करते. यानंतरच संबंधिताला या मशीन्समधून बुलेट्स खरेदी करता येत असल्याचे कंपनीचे सांगणे आहे.
एज व्हेरिफिकेशन टेक्नॉलॉजीचा अर्थ या पद्धतीने गोळ्या खरेदी करणे ऑनलाईन खरेदीपेक्षा अधिक सुरक्षित आहे, कारण यासाठी तुम्हाला तुमच्या वयाचे प्रमाणपत्र रिटेल स्टोअरला द्यावे लागते असे कंपनीचे म्हणणे आहे. 21 वर्षांपेक्षा अधिक वयाचे ग्राहक या वेंडिंग मशीन्समधून सहजपणे गोळ्या खरेदी करू शकतात. कंपनीकडे ऑटोमॅटिक बुलेट डिस्पेंसर 24/7 आहे. या स्टोअरवर अनेक तास रांगेत उभे रहावे लागणार नाही. कुठल्याही समयी गोळ्या खरेदी करता येणार आहेत. या वेंडिंग मशीन्समध्ये इनबिल्ट एआय टेक्नॉलॉजी, कार्ड स्कॅनिंग क्षमता आणि चेहऱ्याची ओळख पटविणारे सॉफ्टवेअर आहे. अमेरिकेन राउंड्सचे सीईओ ग्रांट मॅगर्स यांनी सध्या 4 प्रांतामंध्ये या वेंडिंग मशीन्स इन्स्टॉल करयणत आल्याची माहिती दिली. आणखी 9 प्रांतांमधून ऑटोमेटेड एमो रिटेल मशीनसाठी 200 हून अधिक स्टोअर्सकडून मागणी प्राप्त झाली असून ही संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे मॅगर्स यांनी सांगितले.
विरोध होण्यास सुरवात
अमेरिकेच्या अनेक ग्रोसरी स्टोअरमध्ये लावण्यात येणाऱ्या या वेंडिंग मशीन्सना विरोध देखील होत आहे. अमेरिकेत सामूहिक गोळीबाराच्या घटना वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे. 2024 मध्येच आतापर्यंत सामूहिक गोळीबाराच्या 15 घटना घडल्या आहेत. अशाप्रकारे उघडपणे ग्रोसरी स्टोअरवर गोळ्या मिळू लागल्यास गोळीबाराच्या घटना आणखी वाढतील असे लोकांचे म्हणणे आहे.