17 फेब्रुवारीला सरकारी कार्यालयांत बसवेश्वरांचा फोटो लावा : सिद्धरामय्या
बेंगळूर : राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये 17 फेब्रुवारी रोजी विश्वगुरु बसवेश्वरांचे छायाचित्र लावावे, अशी सूचना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. सिद्धरामय्या यांनी मंगळवारी विधानसौधच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये बसवेश्वरांच्या फोटोचे अनावरण केल्यानंतर ही सूचना दिली. विधानसौधच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये बसवेश्वरांच्या फोटोच्या अनावरणप्रसंगी बोलताना ते म्हणाले, बसवेश्वरांच्या फोटोमध्ये ‘विश्वगुरु बसवेश्वर-सांस्कृतिक नेते’ असा उल्लेख करण्याची सूचना देण्यात आली आहे. माणसाने माणसावर प्रेम केले तर ते सद्गुण. माणसाने माणसाचा द्वेष केला तर तो दुर्गुण. बुद्ध, बसव, आंबेडकर, गांधी यांना विसरता येणार नाही. या चार महापुरुषांची नावे देश विसरू शकत नाही. त्यांनी समाजसुधारणा केली आहे. समाज सुधारण्यासाठी असमानता नष्ट झाली पाहिजे, असे असे सांगितले. अनुभव मंटपच्या माध्यमातून बसवेश्वरांनी संसदीय व्यवस्था आणली. आता ज्याला आपण संसद म्हणतो, तशी व्यवस्था करण्यासाठी बसवेश्वरांनी अनुभव मंटप स्थापन केला होता. 850 वर्षांपूर्वी बसवेश्वरांनी अनिष्ट प्रथा नष्ट करण्यासाठी परिश्रम घेतले होते, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले.