'पुष्पा २' फेम अल्लु अर्जूनची चेंगराचेंगरी प्रकरणी चौकशी सुरू
हैदराबाद
'पुष्पा २' च्या रिलीजच्या वेळी हैदराबादमध्ये एक थिएटरमध्ये चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरी एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. याप्रकरणी 'पुष्पा २' फेम अल्लु अर्जूनला अटक करण्यात आली होती. अल्लू अर्जूनची १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावल्यावर उच्च न्यायालयात धाव घेतल्यावर जामीनावर सुटका झाली होती.
हैदराबादमधील याप्रकरणासंदर्भात अल्लू अर्जूनची चिक्कडपल्ली पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. या चौकशीत अल्लू अर्जूनला पोलिसांनी २० प्रश्न तयार केले आहेत. जामिनावर बाहेर आल्यानंतर अल्लू अर्जूनने पत्रकार परिषद घेत त्याच्यावरील आरोप फेटाळले होते. त्याबद्लही पोलिस त्याची कसून चौकशी करत आहेत. कारण त्याने ही पत्रकार परिषद नियमांविरुद्ध घेतल्याचंही पोलिसांचं म्हणणं आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी विधानसभेत संध्या थिएटरच्या घटनेवर प्रतिक्रिया दिल्यानंतर अल्लू अर्जूनने पत्रकार घेतली होती.