'पुष्पा २' ने पहिल्याच दिवशी तोडले सगळे रेकॉर्डस्
बॉक्स ऑफीसवर पहिल्याच दिवशी विक्रमी ओपनिंग
मुंबई :
पुष्पा २ ने एका दिवसात आजवरचे सर्व सिनेमांचे रेकॉर्ड तोडले आहेत. फक्त भारतामध्ये सर्व भाषांमध्ये एका दिवसात १७५ कोटींनी ओपनिंग केले. तर दुसऱ्या दिवशी ९०.१ कोटींचा बिझनेस केला. पहिल्या दोन दिवसात साधारण २६५ कोटींचा विक्रमी बिझनेस पुष्पा २ ने केला आहे.
जगभरातून एकूण ४०० कोटीहुन अधिक बिझनेस या सिनेमाने पहिल्या दिवसात केला आहे. पुष्पा २ हा एवढं घसघशीस विक्रमी ओपनिंग घेणार पहिला भारतीय सिनेमा ठरला आहे. या सिनेमाने किंग खान शाहरुख खानच्या जवान सिनेमाचा रेकॉर्डही मोडला आहे.
या सिनेमात अभिनेता अलु अर्जून आणि भारताच्या तरुणांचे क्रश असणारी रश्मिका मंधाना मुख्य भूमिकेत आहेत. तर फहाद फासिल याने खलनायकाची भूमिका साकारली आहे. यांच्यासोबत स्रीतेज, अनुसुया भारद्वाज, जगदिश भंडारी, दिवी वेदथ्या असे अनेक कलाकर आहेत.