कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रिलायन्स रिटेलकडून केल्व्हिनेटरची खरेदी

06:19 AM Jul 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने शुक्रवारी प्रतिष्ठित गृहोपयोगी उपकरणे ब्रँड केल्व्हिनेटरच्या अधिग्रहणाची घोषणा केली. कंपनीचे हे पाऊल भारतातील वेगाने वाढणाऱ्या ग्राहकोपयोगी वस्तूंच्या बाजारपेठेत आपले स्थान मजबूत करण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले आहे.

Advertisement

केल्व्हिनेटर भारतात त्याच्या विश्वासार्ह रेफ्रिजरेटर्स आणि ‘द कूलेस्ट वन’ सारख्या संस्मरणीय टॅगलाइनसाठी ओळखले जाते. आता ते रिलायन्सच्या वाढत्या पोर्टफोलिओचा भाग राहणार आहे. कंपनी म्हणते की, ही कंपनी खरेदी करण्याचा उद्देश भारतीय घरांमध्ये जागतिक स्तरावरील उच्च दर्जाची उपकरणे पोहचवणे आहे.

केल्व्हिनेटर पुन्हा लोकप्रिय होईल: ईशा अंबानी

रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या कार्यकारी संचालक ईशा अंबानी म्हणाल्या, ‘कंपनीचे हे अधिग्रहण एक महत्त्वाचे पाऊल आहे. रिलायन्सची मोठी पोहोच आणि रिटेल नेटवर्क केल्व्हिनेटरला पुन्हा लोकप्रिय बनवण्यास मदत करेल.

केल्व्हिनेटरचा 1963 मध्ये भारतात प्रवेश

केल्व्हिनेटरने 1963 मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला आणि 1970-80 च्या दशकात गोदरेज आणि ऑल्विनसह बाजारपेठेत वर्चस्व गाजवले. टिकाऊपणा, परवडणारी किंमत आणि संपूर्ण भारतात पसरलेल्या वितरण नेटवर्कमुळे हा ब्रँड घराघरात पोहोचला.

दरम्यान, 1990 च्या दशकात उदारीकरणानंतर, एलजी आणि सॅमसंग सारख्या जागतिक ब्रँडमधील स्पर्धेमुळे त्याची चमक कमी झाली. इलेक्ट्रोलक्स ते व्हर्लपूल पर्यंत फ्रेंचायझिंग आणि कमी गुंतवणुकीमुळे ब्रँडची उपस्थिती आणखी कमी झाली. तथापि, केल्व्हिनेटरचे स्थान अजूनही अबाधित आहे.

रिलायन्सने कमावले 2,62,779 कोटींचे उत्पन्न

याचदरम्यान रिलायन्स इंडस्ट्रिजचा आर्थिक वर्ष 2025-26 चा पहिल्या तिमाहीचा निकाल जाहीर झाला असून कंपनीने 2,62,779 कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न प्राप्त केले आहे. मागच्या वर्षाच्या समान अवधीच्या तुलनेत उत्पन्न 10 टक्के अधिक आहे. बाजार भांडवल मूल्यात अग्रस्थान असणाऱ्या या कंपनीने मागच्या वर्षी समान अवधीत 2,40,200 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले होते. एकूण उत्पन्नात कर्मचाऱ्यांचे वेतन, कर, कच्च्या मालाची किंमत सारखे खर्च वजा करता कंपनीच्या मालकांकडे 26,994 कोटी रुपयांचा निव्वळ नफा राहतो.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article