सुरळीत वाहतुकीसाठी 4,294 बसेसची खरेदी
मंत्री संतोष लाड यांची विधानपरिषदेत माहिती
बेंगळूर : राज्य सरकारच्या शक्ती योजनेच्या पुरेशा अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर गेल्या 16 महिन्यांत सुरळीत वाहतुकीसाठी सुमारे 4294 बसेसची खरेदी करण्यात आली असून मार्चअखेर आणखी बस खरेदी करण्यात येणार असल्याचे मंत्री संतोष लाड यांनी सांगितले. विधानपरिषदेत सदस्य एस. व्ही. संकनूर यांनी विचारलेल्या प्रश्नावर परिवहन आणि धर्मादाय खात्याच्या मंत्र्यांच्यावतीने संतोष लाड यांनी उत्तर दिले. चारही परिवहन महामंडळांमध्ये 9000 चालकांच्या भरतीला सरकारने यापूर्वीच परवानगी दिली आहे. यापैकी यापूर्वीच 4000 पदे भरण्यात आली आहेत. उर्वरित पदे टप्प्याटप्प्याने भरण्यात येतील, असे मंत्र्यांनी सांगितले. शक्ती योजना कार्यान्वित झाल्यापासून विशेषत: महिलांना मोठा फायदा होत आहे. मोठ्या संख्येने महिला रोजगारात गुंतल्याने आर्थिक विकास शक्मय झाल्याची प्रतिक्रिया मंत्री संतोष लाड यांनी दिली.