कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लखनौसमोर आज पंजाबचे आव्हान

06:50 AM May 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी/ लखनौ

Advertisement

लखनौ सुपर जायंट्सचा सामना आज पंजाब किंग्सशी होणार असून कर्णधार रिषभ पंतचा फलंदाजीतील खराब फॉर्म आणि पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरचा उत्कृष्ट फॉर्म या पार्श्वभूमीवर रविवारी होणार हा सामना रंजक ठरण्याची चिन्हे सिदत आहेत. अय्यरने परिस्थितीची समज आणि कर्णधार म्हणून सुधारणा दाखविण्याबरोबर त्याच्या फलंदाजीशी तडजोड न करता पंजाबला चांगली सेवा दिली आहे.

Advertisement

मागील सामन्यात पंजाबच्या कर्णधाराने हंगामातील त्याचे चौथे अर्धशतक झळकावले, ज्यामुळे त्याचा संघ 10 सामन्यांत 13 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे, पंतने फलंदाजीसह निराशाजनक कामगिरी केली असून 10 सामन्यांत एकूण 110 धावा त्याला जमविता आल्या आहेत. या हंगामात त्याची एकमेव उल्लेखनीय खेळी चेन्नई सुपर किंग्सविऊद्ध 63 धावांची राहिली. पंतच्या खराब फॉर्ममुळे एलसएजीची अडचण झाली असून पंजाबविरुद्ध जिंकणे आवश्यक असलेल्या परिस्थितीत ते पोहोचले आहेत. एलएसजी सध्या 10 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.

पंजाबचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलला फ्रॅक्चर झालेल्या बोटामुळे उर्वरित स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे, त्यामुळे अय्यरला योग्य पर्याय शोधावा लागेल. परिस्थितीनुसार अय्यर अझमतुल्लाह उमरझाई, अद्याप खेळू न शकलेला आरोन हार्डी किंवा अगदी झेवियर बार्टलेटकडे वळू शकतो. फलंदाजी विभागात सलामीवीर प्रभसिमरन सिंग आयपीएलच्या इतिहासात 1100 धावांचा टप्पा ओलांडणारा पहिला भारतीय संघातर्फे न खेळलेला खेळाडू बनला आहे. प्रियांश आर्य, नेहल वधेरा आणि शशांक सिंग यांच्यासारख्या चांगल्या स्थिरस्थावर झालेल्या वरच्या आणि मधल्या फळीसह पंजाबची फलंदाजी भक्कम दिसते. गोलंदाजीच्या आघाडीवर त्यांना युजवेंद्र चहलच्या फॉर्ममध्ये परतण्याने प्रोत्साहन मिळेल.

संघ-लखनौ सुपर जायंट्स : रिषभ पंत (कर्णधार), डेव्हिड मिलर, एडन मार्करम, आर्यन जुयाल, हिम्मत सिंग, मॅथ्यू ब्रेट्झके, निकोलस पूरनमिचेल मार्श, अब्दुल समद, शाहबाज अहमद, युवराज चौधरी, राजवर्धन हंगरगेकर, अर्शीन कुलकर्णी, आयुष बडोनी, शार्दुल ठाकूर, आवेश खान, आकाश दीप, मणिमरन सिद्धार्थ, दिग्वेश सिंग, आकाश सिंग, शमर जोसेफ, प्रिन्स यादव, मयंक यादव, रवी बिश्नोई.

पंजाब किंग्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मार्कस स्टॉइनिस, नेहल वढेरा, ग्लेन मॅक्सवेल, वैशाख विजयकुमार, यश ठाकूर, हरप्रीत ब्रार, विष्णू विनोद, मार्को जॅनसेन, लॉकी फर्ग्युसन, जोश इंग्लिस, झेवियर बार्टलेट, कुलदीप सेन, पायला अविनाश, सूर्यांश शेडगे, मुशीर खान, हरनूर पन्नू, आरोन हार्डी, प्रियांश आर्य, अजमतुल्ला उमरझाई.

सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 वा.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article