For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंजाबचा लखनौशी आज मुकाबला

06:55 AM Apr 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
पंजाबचा  लखनौशी आज मुकाबला
Advertisement

वृत्तसंस्था/ लखनौ

Advertisement

लखनौ सुपर जायंट्स आज मंगळवारी आयपीएलमध्ये फॉर्ममध्ये असलेल्या पंजाब किंग्सविऊद्ध खेळणार असून यावेळी हंगामातील त्यांचा पहिला घरचा सामना जिंकण्यास नवा कर्णधार रिषभ पंत उत्सुक असेल. गेल्या वर्षीच्या लिलावात आयपीएलचा सर्वांत महागडा खेळाडू ठरलेला पंत पहिल्या दोन सामन्यांमध्ये फलंदाज म्हणून  चमक दाखवू शकलेला नाही. त्यामुळे 27 कोटी ऊपये इतक्या मोठ्या किमतीस साजेशी कामगिरी करून दाखविण्यास तो उत्सुक असेल.

एलएसजीमधील त्याच्या कर्णधारपदाची सुऊवात दुर्दैवी पराभवाने झाली, कारण त्याला माजी संघ दिल्ली कॅपिटल्सविऊद्ध फक्त एका गड्याने पराभव पत्करावा लागला. तथापि, एलएसजीने घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादवर पाच गड्यांनी प्रभावी विजय मिळवून दमदार पुनरागमन केले. निकोलस पूरन (23 चेंडूंत 70), मिशेल मार्श (31 चेंडूंत 52) आणि शार्दुल ठाकूर (4-34) यांच्या कामगिरीमुळे लखनौचे पारडे जड राहिले आणि त्यांनी हैदराबादला थोपविले. संघ यशस्वी ठरलेला असला, तरी पंतला सलग दुसऱ्यांदा फलंदाजीमध्ये अपयश आले. सुऊवातीच्या दोन सामन्यांमध्ये तो फक्त 0 आणि 15 धावा करू शकला आहे. त्यामुळे तो त्याच्या फलंदाजीने टीकाकारांना शांत करण्यास उत्सुक असेल.

Advertisement

पहिल्यांदाच पंतचा सामना दिल्ली कॅपिटल्सचे माजी प्रशिक्षक रिकी पाँटेग यांच्याशी होईल. पाँटिंग या हंगामात पंजाब किंग्समध्ये सामील झाले आहेत. आयपीएलच्या इतिहासातील पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वांत महागड्या खेळाडूंमध्ये हा सामना असेल. कारण श्रेयस अय्यर पंजाब किंग्सचे नेतृत्व करत आहे. पंतला संघर्ष करावा लागत असताना 26.75 कोटी ऊपयांना संघात सामील झालेल्या अय्यरने गुजरात टायटन्सविऊद्ध 42 चेंडूंत नाबाद 97 धावा करून आघाडी घेतलेली आहे. तो तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याचा आनंद घेत आहे आणि तोच खेळ येथे सुरू ठेवण्याचा प्रयत्न तो करेल.

शशांक सिंगने मागील हंगामाप्रमाणेच धडाका लावलेला असून प्रियांश आर्यने पंजाबसाठी 23 चेंडूंत 47 धावा करून आयपीएलमध्ये शानदार पदार्पण केले आहे. त्यांच्या फलंदाजीच्या प्रयत्नांना भारताचा जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंग आणि मध्यमगती गोलंदाज विजयकुमार वैशाख यांची साथ लाभलेली आहे. एकाना स्टेडियम सहसा गोलंदाजांना, विशेषत: फिरकीपटूंना आणि संथ गोलंदाजांना पसंती देतो. तथापि, गेल्या हंगामात आयपीएलमध्ये आणि गेल्या महिन्यात झालेल्या चार महिला प्रीमियर लीग सामन्यांत खेळपट्टी वेगवेगळ्या प्रकारे वागली आहे. असे असले, तरी आजच्या सामन्याच्या निकालात दोन्ही बाजूंचे फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

जर एलएसजीची जबरदस्त फलंदाजी फळी भरपूर धावा काढू शकली, तर नंतर रवी बिश्नोईवर त्याच्या प्रभावी लेगस्पिनने यश मिळवून देण्याची जबाबदारी असेल. रवी सध्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये नाही. त्याच्यासोबत सहकारी लेगस्पिनर दिग्वेश राठी असेल. राठीने गेल्या वर्षी पहिल्या दिल्ली प्रीमियर लीगमध्ये आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले होते. यजमानांकडे डावखुरा फिरकी गोलंदाज शाहबाज अहमदला खेळविण्याचा पर्याय देखील आहे. एडेन मार्करमही ऑफस्पिन टाकू शकतो. दुसरीकडे, अनुभवी भारतीय लेगस्पिनर युजवेंद्र चहल पंजाबच्या फिरकी माऱ्याचे नेतृत्व करेल आणि त्याला ग्लेन मॅक्सवेलची देखील मदत होईल. पंजाबकडे वेगवान गोलंदाजीचे भरपूर पर्याय असून गुजरातविऊद्धच्या सामन्यात अय्यरने सात गोलंदाजांचा वापर केला होता.

संघ : पंजाब किंग्स-श्रेयस अय्यर (कर्णधार), प्रियांश आर्य, पायला अविनाश, हरनूर सिंग, जोश इंग्लिस, प्रभसिमरन सिंग, विष्णू विनोद, नेहल वधेरा, अझमतुल्लाह उमरझाई, एरोन हार्डी, मार्को जेनसेन, ग्लेन मॅक्सवेल, मुशिर खान, शशांक सिंग, मार्कस स्टोइनिस, सूर्यांश शेडगे, अर्शदीप सिंग, झेवियर बार्टलेट, युजवेंद्र चहल, प्रवीण दुबे, लॉकी फर्ग्युसन, हरप्रीत ब्रार, कुलदीप सेन, विजयकुमार वैशाख, यश ठाकूर.

लखनौ सुपर जायंट्स : रिषभ पंत (कर्णधार), डेव्हिड मिलर, एडन मार्करम, आर्यन जुयाल, हिम्मत सिंग, मॅथ्यू ब्रीट्झके, निकोलस पूरन, मिचेल मार्श, अब्दुल समद, शाहबाज अहमद, युवराज चौधरी, राजवर्धन हंगरगेकर, अर्शिन कुलकर्णी, आयुष बदोनी, आवेश खान, आकाश दीप, एम. सिद्धार्थ, दिग्वेश सिंग, आकाश सिंग, शामर जोसेफ, प्रिन्स यादव, मयंक यादव, मोहसिन खान, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई.

सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.

Advertisement
Tags :

.