कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पंजाब-दिल्ली आज आमनेसामने

06:21 AM May 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ धरमशाला

Advertisement

दिल्ली कॅपिटल्स व पंजाब किंग्स यांच्यात गुरुवारी आयपीएलमधील महत्त्वाचा सामना होत असून घसरण थांबवत प्लेऑफच्या आव्हान जिवंत ठेवण्याचा दिल्ली कॅपिटल्स प्रयत्न करेल. सायंकाळी 7.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल.

Advertisement

गेल्या पाच सामन्यापैकी त्यांना तीन पराभव स्वीकारावे लागले तर पावसामुळे एक सामना रद्द झाला. सध्या ते गुणतक्त्यात 11 सामन्यांत 13 गुणांसह पाचव्या स्थानावर आहेत. अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील या संघाची घरच्या मैदानावरील कामगिरी निराशाजनक झाली आहे. त्यांना फक्त एक सामना जिंकता आला तोही सुपर ओव्हरमध्ये. पहिले चार सामने जिंकणाऱ्या संघाचे दैव ठिकाण बदलल्यानंतर तरी बदलेल, अशी अपेक्षा त्यांनी केली आहे.

पंजाब किंग्सची कामगिरी मात्र सनसनाटी झाली आहे. 11 पैकी फक्त 3 सामने त्यांनी गमावले तर सात सामने जिंकले आहेत. पदकतक्त्यात ते तिसऱ्या स्थानावर आहेत. दिल्लीच्या फलंदाजीत सातत्याचा अभाव आहे. मात्र पंजाबच्या आघाडी फळीने भक्कम कामगिरी केली आहे. प्रभसिमरन सिंगने फ्लाईंग स्टार्ट देताना आतापर्यंत 437 धावा जमविल्या आहेत. कर्णधार श्रेयस अय्यरही जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. फलंदाजीप्रमाणे नेतृत्वातही त्याने चमक दाखविली आहे. त्याने 4 अर्धशतकांसह 405 धावा जमविल्या आहेत. या मोसमात त्याने 27 षटकार ठोकले असून तो याबाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी त्याने आपल्या नेतृत्वाखाली केकेआरला जेतेपद मिळवून दिले होते. नवी टीम पंजाब किंग्सलाही त्याने योग्य ट्रॅकवर ठेवले असून त्याच्या नेतृत्वकौशल्याचीही तारीफ होत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article