महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पुणेरी पलटनचा बंगालवर विजय

06:45 AM Nov 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / नोएडा

Advertisement

2024 च्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात पुणेरी पलटनने बंगाल वॉरियर्सचा 51-34 अशा 17 गुणांच्या फरकाने पराभव केला. या सामन्यात पुणेरी पलटनने सांघिक कामगिरीच्या जोरावरच विजय हस्तगत केला. या स्पर्धेतील हा 73 वा सामना होता.

Advertisement

पुणेरी पलटन संघातर्फे या सामन्यात मोहीत गोयात, आकाश शिंदे आणि पंकज मोहीत यांची चमकदार कामगिरी झाली. या तीन कबड्डी.0 rपटूंनी बंगाल वॉरियर्सचे चारवेळा सर्वगडी बाद केले. या सामन्यातील विजयामुळे पुणेरी पलटनने स्पर्धेच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. सामना सुरू झाल्यानंतर पहिल्या 10 मिनिटांच्या कालावधीतच पुणेरी पलटनने बंगाल वॉरियर्सवर 7 गुणांची आघाडी मिळविली होती. पहिल्या सात मिनिटांच्या कालावधीतच बंगाल वॉरियर्सचे सर्व गडी बाद झाले. बंगाल वॉरियर्सतर्फे अविनाश नदराजन याच्याकडून एकाकी खेळी झाली. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत पुणेरी पलटनने बंगाल वॉरियर्सवर 24-11 अशी आघाडी मिळविली होती. सामन्याच्या उत्तराधार्थाला कर्णधार पंकज मोहीतेने आपल्या शानदार चढायांवर बंगाल वॉरियर्सच्या हेमराज, प्रणय राणे आणि आकाश चव्हाण यांना बाद केले. मोहीतच्या शानदार कामगिरीमुळे बंगाल वॉरियर्सचे तिसऱ्यांदा सर्वगडी बाद झाले. सामना संपण्यात केवळ 6 मिनिटे बाकी असताना बंगाल वॉरियर्सचे चौथ्यांदा सर्वगडी बाद झाले. पुणे पलटनच्या नितीनकुमारने सुपर 10 गुण नोंदविले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article