वसगडेतील शेतकरी आक्रमक ; रेल्वे अडवत रूळावर बसून आंदोलन
02:10 PM Sep 13, 2023 IST
|
Abhijeet Khandekar
Advertisement
वसगडे, वार्ताहर
Vasagade Farmar Railway Andolan : पुणे- मिरज -लोंढा रेल्वे मार्गावरील दुहेरीकरण करताना शेतकऱ्यांच्या जमिनी रुळाखाली गेल्याने त्या बदल्यात मोबदला तसेच शेतीकडे जाणारे रस्ते करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा सुरू आहे. परंतु रेल्वे अधिकारी या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याने गत दहा दिवसापासून वसगडे रेल्वे गेट वरती ठ्ठिया आंदोलन सुरू होते.
Advertisement
दरम्यान, लोकप्रतिनिधींनी रेल्वे विभागाकडे पाठपुरावा करून सुद्धा फारसा प्रतिसाद न मिळाल्याने वसगडेतील शेतकरी आज स्वतःच्या हद्दीतील रूळावर बसून राहिले आहेत. आत्ताच आलेली रेल्वे शेतकऱ्यांनी रोखून धरल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. शेतकरी स्वतःच्या हद्दीत बसून असल्याने रेल्वे पोलीस स्थानिक पोलीस काही करू शकत नसल्याने रेल्वे अधिकारी तात्काळ पोहोचण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे
Advertisement
Advertisement
Next Article