पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन 7 डिसेंबरला
प्रतिनिधी/ पुणे
यंदाची पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन येत्या रविवारी (दि.7 डिसेंबर) पहाटे 3 वाजता सुरू होणार असून, याची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. दरवषीप्रमाणे यंदाही मॅरेथॉन भवन येथे ‘एक्स्पो प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे.
यंदा गतविजेती खेळाडू ज्योती गवते, 2023 सालचा द्वितीय क्रमांकाचा विजेता केनियाचा धावपटू सायमन मवॉगी याशिवाय सेनादल, रेल्वे, पोलीस, आर्मी स्पोर्ट्स इस्टिट्यूट, बॉम्बे सॅपर्स, एसआरपीएफ, एनडीए येथील अव्वल दर्जाचे धावपटू सहभागी होत आहेत. स्पर्धेसाठी पुणे जिल्हा हौशी अॅथलेटिक्स संघटनेचे 50 पंच, तांत्रिक अधिकारी आणि 20 मोटरसायकल पायलट्स सहभागी होतील. संघटनेचे सचिव राजू कुलकर्णी यांच्या नेतृत्वात चंद्रकांत पाटील, विजय बेंगले, रोहित घाग आदी आंतरराष्ट्रीय पंच काम करणार आहेत. त्यांना रेस डायरेक्टर सुमंत वाईकर आणि टेक्निकल रेस डायरेक्टर वसंत गोखले हे मार्गदर्शन करतील. यांचे मॉक ड्रिल शुक्रवारी (दि. 5) पहाटे 5 ते 7 या वेळात स्पर्धा मार्गावर होईल.
मॅरेथॉन स्पर्धेचे ‘एक्स्पो’ प्रदर्शन आणि टी शर्ट्स आणि बीब नंबर्स वाटप शुक्रवारी (दि. 5) सुरू होईल. मॅरेथॉन मधील विजेत्या धावपटूंना बांबू सोसायटी ऑफ इंडियातर्फे बांबूपासून तयार केलेल्या ट्रॉफीज देण्यात येतील, ज्या टीकाऊ आणि पर्यावरणीय जबाबदारीचे प्रतीक असेल आणि हेच या वषीचे ध्येयवाक्मय आहे, अशी माहिती मॅरेथॉनचे विश्वस्त अॅड. अभय छाजेड व रोहन मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.