महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पुणे-हुबळी ‘वंदे भारत’चा आज शुभारंभ

11:39 AM Sep 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव स्थानकात आज रात्री दिमाखात स्वागत : वेगवान प्रवास : केवळ साडेसहा तासात गाठणार बेळगाव

Advertisement

बेळगाव : पुणे-हुबळी वंदे भारतचा शुभारंभ सोमवार दि. 16 रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन होणार आहे. रात्री 8 वाजता बेळगाव रेल्वेस्थानकावर वंदे भारतचे स्वागत केले जाणार असून यासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा तसेच बेळगावचे लोकप्रतिनिधी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यामुळे बेळगावकरांचे स्वप्न सोमवारी प्रत्यक्षात पूर्ण होणार आहे. बेळगाव ते पुणे हा रेल्वे प्रवास अवघ्या साडेसहा तासांमध्ये करता येणार आहे. भारतीय रेल्वेने यासाठीचे बुकिंगही सुरू केले आहे. रेल्वेच्या आयआरसीटीसी या वेबसाईटवर बुकिंग केले जात आहे. जेवणासहित व जेवणरहित अशा दोन प्रकारांमध्ये तिकिटाचा दर आहे. बेळगाव-पुणे हा वंदे भारतचा वेगवान प्रवास करण्यासाठी जेवणारहित 955 रु. तर जेवणासहित 1,295 रुपये तिकिट दर निश्चित करण्यात आला आहे. वंदे भारत एक्स्प्रेसला एकूण आठ डबे जोडण्यात आले आहेत. 478 चेअर कारसीट तर 52 एक्झिक्युटीव्ह क्लास सीट असतील. हुबळी येथून आठवड्यातून तीन दिवस बुधवार, शुक्रवार व रविवार सेवा दिल्या जाणार आहेत. तर पुणे येथून गुरुवार, शनिवार व सोमवारी वंदे भारत धावणार आहे.

Advertisement

खासदारांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र

बेंगळूर-धारवाड वंदे भारत एक्स्प्रेसचा विस्तार बेळगावपर्यंत करावा, अशी मागणी बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी पत्राद्वारे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. रविवारी त्यांनी हे पत्र रेल्वेमंत्र्यांना पाठवून पुणे-हुबळी वंदे भारतबाबत रेल्वेमंत्र्यांचे आभार मानत बेळगाव-बेंगळूर मार्गावर वंदे भारत सुरू करण्यासाठी तांत्रिक अडचणी दूर झाल्या असून लवकरात लवकर एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी केली आहे.

बेळगाव-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा प्रवास

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article