महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार ‘आशिक’ फरार घोषित

06:37 AM Feb 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एनआयए न्यायालयात सुनावणी

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

Advertisement

पुलवामा येथील आत्मघाती हल्ल्या गुन्हेगारांमध्ये सामील जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आशिक नेंगरूला एनआयए न्यायालयाने फरार घोषित केले आहे. आशिक नेंगरू उर्फ मौलवी 2018 मध्ये पाकिस्तानात पळाला होता आणि तेथून जम्मू-काश्मीरमध्ये ड्रोनद्वारे शस्त्रास्त्रs तसेच अमली पदार्थ पाठविण्याच्या कटात तो सामील राहिला आहे. तसेच स्थानिक युवांना इंटरनेटद्वारे स्वत:च्या जाळ्यात अडकवून दहशतवादी संघटनांमध्ये सामील करत आहे.

आशिक नेंगरूला केंद्रीय गृह मंत्रालयाने 2022 मध्ये दहशतवादी घोषित केले आहे. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्याचा रहिवासी असलेला नेंगरू हा 14 फेब्रुवारी 2019 रोजी सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्याच्या कटात सामील होता. या हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले हेते.

आशिक नेंगरू हा पाकिस्तानात बसून इंटरनेटद्वारे पुलवामा समवेत खोऱ्यातील विविध हिस्स्यांमध्ये स्थानिक युवकांशी संपर्क साधून त्यांना दहशतवादी संघटनेत सामील करण्यासाठी चिथावणी देत आहे. दहशतवादी संघटनेत सामील झालेल्या अनेक युवकांना तपास यंत्रणांनी पकडल्यावर त्यांनी आशिक नेंगरूचे नाव घेतले आहे. तसेच त्याच्या विरोधात अनेक पुरावे देखील मिळाले आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article