महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पीयुसी परीक्षा-3 चे वेळापत्रक जाहीर

11:13 AM May 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

24 जून ते 5 जुलै दरम्यान परीक्षा : अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी

Advertisement

बेळगाव : पीयुसी-2 चा निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाला. या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पीयुसी बोर्डने आणखी एक संधी दिली आहे. निकाल जाहीर होताच पीयुसी परीक्षा-3 चे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले. 24 जून ते 5 जुलै या दरम्यान परीक्षा घेतली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश घेणे सोयीचे होईल. काही दिवसांपूर्वीच झालेल्या पीयुसी परीक्षा-2 चा निकाल मंगळवारी जाहीर झाला. परीक्षा मंडळाच्या वेबसाईटवर निकाल जाहीर करण्यात आला. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी हवी असेल त्यांना प्रत्येक विषयासाठी 530 रुपये भरावे लागणार आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांना पुनर्रमूल्यमापनाला उत्तरपत्रिका द्यायची असेल तर प्रत्येक विषयाला 1670 रुपये द्यावे लागणार आहेत.

Advertisement

पदवीपूर्व शिक्षण विभागाने पीयुसी परीक्षा-3 चे वेळापत्रक जाहीर

केले आहे. दि. 24 जून-कन्नड, 25 जून-इंग्रजी, 26 जून-सोशिओलॉजी, बायोलॉजी, जिओलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, 27 जून-अकौंटन्सी, 28 जून-इकॉनॉमिक्स व केमिस्ट्री, 29 जून-हिस्ट्री व फिजिक्स, 1 जुलै- पॉलिटिकल सायन्स व स्टॅटेस्टिक्स, 2 जुलै-बिझनेस स्टडीज, मॅथेमॅटिक्स व एज्युकेशन, 3 जुलै-जिओग्राफी, सायकोलॉजी, 4 जुलै-हिंदी, 5 जुलै-मराठी व इतर भाषा विषयांचे पेपर होणार असल्याची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article