महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

श्री राम जन्मभूमीवर डाक तिकीटाचे प्रकाशन

07:00 AM Jan 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

अयोध्येतील भव्य राममंदिरात भगवान रामलल्लांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचे चित्र असलेल्या डाक तिकिटाचे प्रकाशन केले आहे. गुरुवारी हे प्रकाशन करण्यात आले आहे. त्याच्यासमवेत संपूर्ण जगात भगवान प्रभू रामचंद्रांवर प्रकाशित करण्यात आलेल्या डाक तिकिटांची एक पुस्तिकाही त्यांनी प्रसिद्ध केली आहे. 22 जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने भारतातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान हाती घेण्यात यावे, असे आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केले आहे. त्याला अनुसरुन असंख्य मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान स्थानिक नागरिकांकडून तसेच मंदिरांच्या व्यवस्थापनांकडून हाती घेण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनीही त्यांच्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये मंदिर स्वच्छता करण्याच्या अभियानाचा प्रारंभ केला आहे.

Advertisement

युवकांना मिळेल प्रोत्साहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने सहा डाक तिकिटांचे प्रकाशन केले आहे. ही डाक तिकिटे तसेच जगभरातील प्रभू रामचंद्रांशी संबंधित डाक तिकिटांच्या पुस्तिकेमुळे युवकांना रामचरित्रासंबंधी जाणून घेण्याची प्रेरणा मिळेल. तसेच भगवान रामचंद्रांचा आदर्श पाळण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असे प्रतिपादन त्यांनी या तिकिटांचे प्रकाशन केल्यानंतर बोलताना केले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article