For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘माझे शहर माझी जबाबदारी’ माहिती पुस्तिकेचे प्रकाशन

10:08 AM Mar 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘माझे शहर माझी जबाबदारी’ माहिती पुस्तिकेचे प्रकाशन
Advertisement

बेळगाव वॉर्ड समितीकडून जनजागृती

Advertisement

बेळगाव : ‘माझे शहर माझी जबाबदारी’ या उपक्रमांतर्गत बेळगाव वॉर्ड समितीकडून माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. नागरिकांना आपल्या जबाबदारीची जाणीव करून देणारी ही माहिती पुस्तिका आहे. टिळकवाडी येथील ‘उदय भुवन’ येथे जनाग्रह संस्थेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मंजुनाथ हंपापूर उपस्थित होते. वॉर्ड समितीच्या सदस्या गौरी गजबर, प्रेमा चौगुला, ज्येष्ठ नागरिक बाबू साखरे उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून स्थानिक समस्या निवारण करणे, नागरिकांना आपल्या जबाबदारीची जाणीव करून देणे व समस्यांचे निराकरण करून घेण्यास सहकार्य करणे, तसेच नागरिकांना समुदाय नागरिक म्हणून परिवर्तन घडवून आणणे असा या उपक्रमाचा उद्देश आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली. बेळगाव वॉर्ड समितीचे सदस्य संजय दिवेकर, राघवेंद्र नायडू, शिवशंकर ऐहोळे उपस्थित होते. ‘माझे शहर माझी जबाबदारी’ या माहिती पुस्तिकेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जागृती करून त्यांच्या हक्क व जबाबदारीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सदर पुस्तिका मिळवून नागरिकांनी याची माहिती करून घ्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले.

Advertisement
Advertisement
Tags :

.