महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शिवाजी पाटील यांना कानडी गावाचा जाहीर पाठिंबा

02:02 PM Nov 11, 2024 IST | Radhika Patil
Public support of Kandi village to Shivaji Patil
Advertisement

चंदगड : 

Advertisement

चंदगड विधानसभेचे अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांना कानडी गावाचा जाहीर पाठिंबा घोषित करण्यात आला आहे. चंदगड भागामध्ये विकासाच्या कामाची गंगा म्हणून सुपरिचित असलेले शिवाजी भाऊ यांना या वेळेला जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करण्याचा एक मताने निर्धार केल्यानंतर या कानडी गावातील सर्व नागरिकांनी थेट चंदगड सावर्डे येथील कार्यालयाला स्वतः भेट देऊन अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांची भेट घेऊन जाहीर पाठिंबा देण्यात आला

Advertisement

यावेळी अनेक ज्येष्ठ नागरिकासह युवा काबर्यकर्ते व युवा युवती महिला वर्गासह अनेकांनी शिवाजी पाटील यांची वैयक्तिक भेट घेऊन गावचा विकास साधने त्याच बरोबर विविध समस्या भविष्यात मार्गी लावण्या संदर्भात आपण कटिबद्ध असल्याचे यावेळी शिवाजी पाटील यांना आश्वासन दिल्याने संपूर्ण कानडी गावाच्या नागरिकांनी जाहीर पाठिंबा घोषित केला, आणि निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्धार केला,

यावेळी कानडी गावचे प्रमुख नामदेव हरेर, हंबीरराव पडते ,शिवाजी कांबळे ,विठ्ठल गडदे, नारायण सुभेदार, सदानंद जाधव, महादेव हरेर, महादेव जाधव, गावातील अनेक ग्रामस्थ व युवा, युवती ,महिला वर्गासह अनेक उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#Shivaji Patil #Kandi village#tarun_bharat_news#tarunbharatSocialMedia
Next Article