डफळापूरात मुस्लिम समाजाने दिला मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा
जत, प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी राज्यभर आंदोलन सुरू झाले आहे. जत तालुक्यातही कर्नाटकची बस फोडलेली घटना वगळता आंदोलन शांततेत सुरू आहे. डफळापूर येथेही माजी पंचायत समिती दिग्विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. गुरुवारी सकाळी जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दुपार पर्यंत जत सांगली रस्त्यावरील वाहतूक बंद होती. टायरी पेटऊन रस्ते बंद करण्यात आले.
दरम्यान, डफळापूरसह परिसरात मुस्लिम समाज मोठ्या संख्येने आहे. डफळापूरात सुरू असलेल्या आंदोलनस्थळी जिल्हा बँकेचे संचालक मन्सूर खतीब व अन्य समजबाधवांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावे म्हणून पाठिंबा दिला. पाठिंब्याचे पत्र देत आम्ही मराठा समाजासोबत असल्याचे मन्सूर खतीब यांनी सांगितले.
तात्काळ आरक्षण द्या- मन्सूर खतीब
जत तालुक्यातील तमाम मुस्लिम समाज बांधव मराठा समाजाला आरक्षण द्यावे यासाठी आग्रही आहे. शासनाने मराठा समाजाचा अंत न पाहता आरक्षण द्यावे अन्यथा मुस्लिम समाजही मराठा समाजाबरोबर आंदोलनात उतरेल व तीव्र आंदोलन करेल असा इशारा जिल्हा बँकेचे संचालक मन्सूर खतीब यांनी यावेळी बोलताना दिला आहे.
जतमध्ये आरक्षणासाठी कॅन्डल मार्च ,बंद
मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाज जत यांच्यावतीने गुरुवारी बंद पुकारण्यात आला होता, बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद माळाला. तर समाज बांधवानी रस्त्यावर उतरत कॅन्डल मार्च काढून आरक्षणाची जोरदार मागणी केली.कालपासून सकल मराठा समाजाच्यावतीने छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्याजवळ साखळी उपोषणाला सुरूवात करण्यात आली आहे. आज दुसरा दिवस होता.
जो पर्यंत मराठा समाजास आरक्षण मिळत नाही तो पर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असल्याची माहिती नेते रणधिर कदम यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.काल आडवहोकेट रणधिर कदम यांच्या नेत्रत्वाखाली कॅन्डल मार्च काढण्यात आला.
कालपासून सौ. श्रध्दा शिंदे यांच्या नेत्रत्वाखाली साखळी उपोषणाला सुरूवात करण्यात आले असून ,महिलांनी उपोषणात मोठ्या संखेने भाग घेतला. यावेळी मराठा स्वराज्य संघाचे अध्यक्ष महादेवराव साळूंखे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आपला पाठींबा जाहिर केला.