अर्थसंकल्पासाठी सरकारने मागविल्या जनेतच्या सूचना
पणजी : यंदाचा अर्थसंकल्प लोकाभिमूख करण्याच्या दृष्टीने सरकारने सामान्य नागरिकांकडून उपयुक्त सूचना, शिफारशी मागवल्या आहेत. अर्थसंकल्प स्वयंपूर्णतेला पाठिंबा देणारा असेल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले असून नागरिकांनी यात सहभाग घेऊन सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दि. 2 फेब्रुवारी पासून प्रारंभ होणार आहे. आठवडाभर चालणाऱ्या या अधिवेशनात मुख्यमंत्री 2024-25 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पाची जोरदार तयारी सुरू असून त्यात विविध खात्यांच्या प्रमुखांसह गोवा चेंबर, उद्योग, पर्यटन, सहकार संबंधित संघटना यांच्याशी चर्चा सुरू आहे. त्यानुसार गोवा चेंबर तसेच औद्योगिक विश्वातील मान्यवर, टॅव्हल अँड टुरिझम संघटना आदींनी आपल्या विविध मागण्या मांडल्या आहेत.https://goabudget.gov.in किंवा https://goaonline.gov.in/budget यावर आपल्या सूचना व कल्पना पाठवाव्यात, असे सरकारतर्फे कळविण्यात आले आहे.