Satara News : लोणंद शहरात तरुणांचा जाहीर निषेध मोर्चा
लोणंदमध्ये वैध धंदे व पोलिसांच्या भूमिकेविरोधात तरुणांचा संताप उसळला
लोणंद : लोणंद शहरात सुरु असलेले विविध अवैध धंदे, नगरपंचायत प्रशासनाचा अनागोंदी कारभार आणि डी. जे. संदर्भातील निर्णय प्रक्रियेत पोलीस प्रशासनाने घेतलेली राजकीय दबावाखालील वादग्रस्त भूमिका या तिन्ही विषयांच्या निषेधार्थ रविवार, दि. ५ रोजी लोणंदमध्ये तरुणांच्या वतीने हाताला काळ्या फिती लावून भव्य जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला.
सकाळी साडे दहा वाजता नगरपंचायत प्रांगणातून मोर्चास प्रारंभ झाला. शहरातील शेकडो तरुणांनी सहभाग घेतला. निषेध यात्रेचा नारा होता "जाहीर निषेध... जाहीर निषेध... जाहीर निषेध!" मोर्चाच्या माध्यमातून तरुणांनी प्रशासनाविरोधात तीब्र नाराजी व्यक्त केली. अवैध धंदे बंद करा, नगरपंचायत प्रशासनाचा जाहीर निषेध, राजकीय दबावाखाली निर्णय नकोत, जनतेला न्याय मिळालाच पाहिजे' अशा घोषणा देत बातावरण दणाणून गेले.
मोर्चा नगरपंचायत प्रांगणातून सुरु होऊन शहरातील प्रमुख मार्गाने फिरत बसस्थानक परिसरात पोहोचला. येथे तरुणांनी काही वेळ ठिय्या आंदोलन केले. यावेळी तरुणांकडून पोलिसांनी तातडीने मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
निषेध सभेत बोलताना हर्षवर्धन शेळके म्हणाले की, आपला बचाव करण्यासाठी लोणंद नगरपंचायतीने व्यापारी असोसिएशनचे डॉल्बी बंद बाबतचे पत्र घेतले व तरुणांच्या रोषाला ऐनवेळी व्यापारी असोसिएशनला एकटे सामोरे जावे लागेल. नगरपंचायत मार्फत डॉल्बी बंदीचा ठराव करण्यात आला. गणपती मंडळांना डॉ ल्बी न लावण्याबाबत सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या होत्या,
परंतु नवरात्री काळात राजकीय दबावामुळे पोलीस स्टेशनने सर्व नियम धाब्यावर ठेवून राजकीय वरदहस्त असणाऱ्या मंडळांना मोठ्या आवाजात डॉल्बी वाजवण्यास परवानगी दिली. त्याचबरोबर बंदी असणाऱ्या लेझर लाईटचा वापर लोणंद शहरात करण्यात आला. विसर्जन मिरवणुकीची वेळ रात्री दहा वाजेपर्यंत असताना लोणंदमध्ये डॉल्बी बारा वाजेपर्यंत बाजली. या सर्वस्वी गोष्टीला पोलीस प्रशासन जबाबदार आहे. लोणंदमध्ये खुलेआम बेश्या व्यवसाय, चक्री व्यवसाय, गांजा व्यवसाय,
देण्यात आल्या होत्या, परंतु नवरात्री काळात राजकीय दबाबामुळे पोलीस स्टेशनने सर्व नियम धाब्यावर ठेवून राजकीय वरदहस्त असणाऱ्या मंडळांना मोठ्या आवाजात डॉल्बी वाजवण्यास परवानगी दिली. त्याचबरोबर बंदी असणाऱ्या लेझर लाईटचा वापर लोणंद शहरात करण्यात आला. विसर्जन मिरवणुकीची वेळ रात्री दहा वाजेपर्यंत असताना लोणंदमध्ये डॉल्बी बारा वाजेपर्यंत बाजली.
या सर्वस्वी गोष्टीला पोलीस प्रशासन जबाबदार आहे. लोणंदमध्ये खुलेआम वेश्या व्यवसाय, चक्री व्यवसाय, गांजा व्यवसाय, मटका व्यवसाय असे अवैध धंदे बोकाळले आहेत, हे सर्व अवैध धंदे पुढील आठ दिवसांमध्ये बंद न झाल्यास तीव्र आंदोलन करू असे भारतीय जनता पार्टीच युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस हर्षवर्धन शेळके पाटील यांनी तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी कय्यूम मुल्ला, गणेश दणाणे, जाविद पटेल यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
मंत्री जयकुमार गोरे यांचा पोलीस अधिकाऱ्याला फोन
पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन सुरू असतानाच हर्षवर्धन शेळके पाटील यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना सांगितला. त्याच क्षणी उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला जयकुमार गोरे यांनी तरुणांवरती आक्रमक होण्याची वेळ का आणली असा सवाल केला. सदरचा सर्व प्रकार पोलीस अधीक्षक यांना बोलणार असल्याचे जयकुमार गोरे यांनी सांगितले.