स्लोव्हेनियात ‘जनमता’चा इच्छामरणाला तीव्र विरोध
06:13 AM Nov 25, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ लुब्लियाना
Advertisement
स्लोव्हेनियन नागरिकांनी नुकताच एका जनमत चाचणीत गंभीर आजार असलेल्या लोकांना त्यांचे जीवन संपवण्याची परवानगी देणारा इच्छामरणाचा कायदा नाकारला. अर्थातच येथील बहुतांश लोकांनी इच्छामरणाला तीव्र विरोध दर्शवला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या प्राथमिक निकालांमध्ये ही माहिती उघड झाली. जवळजवळ पूर्ण झालेल्या मतमोजणीनुसार, सुमारे 53 टक्के मतदारांनी विरोधात, तर सुमारे 46 टक्के लोकांनी कायद्याच्या बाजूने मतदान केले. निवडणूक आयोगाने सुमारे 50 टक्के मतदान झाल्याचे नोंदवले. इच्छामरणाच्या विरोधातील मोहिमेचे नेतृत्व करणारे रूढीवादी कार्यकर्ते अलेश प्रिमक यांनी येथील जनतेने दिलेल्या निवाड्याचे स्वागत केले आहे.
Advertisement
Advertisement
Next Article