For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनजागृती

10:34 AM Apr 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनजागृती
Advertisement

शिक्षक, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना मतदानाबाबत जनजागृती करण्याचे आवाहन

Advertisement

बेळगाव : मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने जनजागृती करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार महानगरपालिकेतर्फे शहरातील विविध भागामध्ये जनजागृती करण्यात येत आहे. सोमवारी येथील सरदार्स हायस्कूल व महाविद्यालयामध्ये मतदानासंदर्भात जनजागृती केली. महानगरपालिका आयुक्त आणि निवडणूक अधिकारी पी. एन. लोकेश यांनी शिक्षक, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना मतदानाबाबत जनजागृती करण्याचे आवाहन केले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जनजागृती केली जात आहे. शहरामध्ये मतदान जनजागृती रॅली, याचबरोबर विविध शाळा, संघ-संस्थांमध्ये मतदान करण्याचे आवाहन केले आहे. मतदानाचा अधिकार प्रत्येकाने बजावावा, प्रत्येक मत हे महत्त्वाचे आहे. लोकशाहीमध्ये मतदानाला महत्त्व असून, त्या दिवशी प्रत्येकाने मतदान करावे, असे त्यांनी सांगितले. याचबरोबर इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करा, असे आवाहनही करण्यात आले. यावेळी विविध अधिकारी तसेच शिक्षक उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.