For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पीएसटी शिक्षक आंदोलनाच्या पवित्र्यात

10:43 AM Aug 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
पीएसटी शिक्षक आंदोलनाच्या पवित्र्यात
Advertisement

पात्रतेचा विचार न करताच बदली प्रक्रिया राबविल्यामुळे शिक्षकांवर अन्याय

Advertisement

बेळगाव : प्राथमिक सरकारी शाळांमधील प्रायमरी स्कूल टीचर (पीएसटी) शिक्षकांवर अन्याय झाला आहे. पीएसटी शिक्षक पदवीधर असतानाही त्यांना पदोन्नती देण्याऐवजी पदावनती देण्यात आली. पात्रतेचा विचार न करताच बदली प्रक्रिया राबविण्यात आल्यामुळे शिक्षकांवर अन्याय झाला असून या विरोधात 12 ऑगस्ट रोजी बेंगळूर येथे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष जयकुमार हेब्बळ्ळी यांनी दिली. बुधवारी कन्नड साहित्य भवन येथे कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शिक्षकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. राज्यातील 80 हजार पीएसटी शिक्षक पदवीधर आहेत. परंतु, पदोन्नती न देता त्यांची बोळवण करण्यात आली. केवळ एजीटी शिक्षकांनाच पदोन्नती देण्यात आल्यामुळे पीएसटी शिक्षकांवर अन्याय झाला आहे. याबद्दल 12 ऑगस्ट रोजी बेंगळूरमधील फ्रिडम पार्क येथे आंदोलन केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

7 ऑगस्टला पालकमंत्र्यांना निवेदन देणार

Advertisement

7 ऑगस्ट रोजी बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन दिले जाणार आहे. शिक्षकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठविण्याची मागणी त्यांच्याकडेही केली जाणार आहे. या बैठकीला संघटनेचे पदाधिकारी तसेच शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.