कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पीएसआय भरती प्रक्रियेला लवकरच प्रारंभ

06:45 AM Jun 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांची माहिती : 1 हजार पदे रिक्त

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

राज्यात पीएसआय भरती घोटाळ्यानंतर पाच वर्षांपासून पोलीस भरती झालेली नाही. एक हजार पीएसआय पदे रिक्त आहेत. आमचे सरकार लवकरच भरती प्रक्रिया सुरू करेल, अशी माहिती गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी दिली. रविवारी कोप्पळ जिल्हा काँग्रेस कार्यालयाच्या भेटीप्रसंगी पत्रकारांशी ते बोलत होते. यापूर्वीच 500 पीएसआय पदांसाठी भरती करण्यात आली असून सर्वांचे प्रशिक्षण सुरू आहे. राज्यात आठ हजार कॉन्स्टेबल पदे रिक्त आहेत. रिक्त पदे प्राधान्याने भरण्यासाठी पावले उचलली जातील. राज्यातील अतिरिक्त वाहतूक पोलीस ठाण्यांसह इतर कामांसाठी पुढील अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली जाईल, असेही गृहमंत्री परमेश्वर यांनी स्पष्ट केले.

आळंदचे आमदार बी. आर. पाटील, मंत्री एच. के. पाटील यांनी केलेल्या आरोपांवर यांनी प्रतिक्रिया देताना, त्यांनी केलेले आरोप सरकारविऊद्ध नव्हते. एच. के. पाटील म्हणाले की खाण घोटाळ्यात दीड लाख कोटी ऊपये दुसऱ्या कोणाकडे गेले आहेत. या प्रकरणाची चौकशी करावी आणि घोटाळ्यात सहभागी असलेल्यांची मालमत्ता जप्त करावी, असा सल्ला त्यांनी सरकारला दिला आहे. त्याची चौकशी केली जाईल. बी. आर. पाटील वरिष्ठ असून त्यांचा सल्लाही सरकार स्वीकारेल. सरकार प्रत्येकांच्या कामाला प्राधान्य देत आहे. येथे कोणालाही धमकावले जात नाही किंवा त्यांच्या शब्दांविऊद्ध आणि सूचनांविऊद्ध काहीही केले जात नाही, असेही गृहमंत्र्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article