For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव-चोर्ला रस्त्यावरील झुडुपे छाटणी सुरू

10:40 AM Jun 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव चोर्ला रस्त्यावरील झुडुपे छाटणी सुरू
Advertisement

‘तरुण भारत’ वृत्ताची दखल : वाहनधारकांना ठरत होते धोकादायक, प्रवाशांतून समाधान

Advertisement

खानापूर : बेळगाव-चोर्ला गोवा मार्गावर वाढलेल्या झाडांच्या फांद्या आणि झुडपांमुळे वाहनांचा प्रवास धोकादायक बनला होता. वाढलेल्या झुडपांमुळे समोरुन येणारे वाहन दिसत नसल्याने अनेकवेळा अपघात घडत असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूची झुडुपे छाटून रस्ता प्रवासासाठी सुलभ करणे गरजेचे होते. याबाबत ‘तरुण भारत’मधून दोन दिवसापूर्वी सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल वनाधिकारी सुनिता निंबरगी यांनी घेत आपल्या कर्मचाऱ्यांना रस्त्याच्या दोन्ही बाजूची झुडुपे आणि फांद्या छाटणी करून रस्ता वाहतुकीस सुलभ करावा, असे आदेश दिले होते. त्या दृष्टीने चोर्ला रस्त्यावरील झुडुपे हटवण्याचे काम हाती घेण्यात आल्याने नागरिकांतून आणि प्रवाशांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

बेळगाव व्हाया चोर्ला-गोवा हा रस्ता गोवा राज्यासाठी अत्यंत जवळचा असल्याने या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात प्रवासी तसेच अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. गेल्या काही वर्षापासून वनखात्याच्या आडमुठ्या धोरणामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून या झुडुपांची छाटणी करण्यात आली नव्हती. त्यामुळे झुडुपे आणि फांद्या रस्त्याच्या दोन्ही बाजूनी वाढून रस्त्यावर आल्याने प्रवास करताना धोक्याचे बनले होते. याबाबत जांबोटी-कणकुंबी परिसरातील नागरिक आणि प्रवाशांनी ‘तरुण भारत’शी संपर्क साधून याबाबत झुडुपांची छाटणी संदर्भात वनखात्याकडून तातडीने उपाययोजना करण्यात यावी, यासाठी वृत्त प्रसिद्ध करण्यासंदर्भात सूचना केली होती. ‘तरुण भारत’मधून यासंदर्भात छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध होताच वनाधिकारी सुनिता निंबरगी यांनी तातडीने रस्त्यावरील झुडुपे आणि फांद्या हटवण्याचे काम हाती घेतल्याने समाधान व्यक्त होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.