For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिंडलगा ग्राम पंचायततर्फे स्वच्छतेसाठी ट्रॅक्टरची सोय

10:57 AM Sep 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
हिंडलगा ग्राम पंचायततर्फे स्वच्छतेसाठी ट्रॅक्टरची सोय
Advertisement

वार्ताहर/हिंडलगा 

Advertisement

हिंडलगा, आंबेवाडी, मण्णूर भागात दीड दिवसाच्या गणपती विसर्जनापासून अनंत चतुर्दशीपर्यंत हिंडलगा, आंबेवाडी मार्गावर असणाऱ्या मार्कंडेय नदीत मोठ्या प्रमाणात मूर्तींचे विसर्जन केले होते. त्यामुळे या परिसरात निर्माल्य तसेच प्लास्टिक इतर वस्तू मोठ्या प्रमाणात टाकण्यात आल्या होत्या. याची दखल हिंडलगा ग्रामपंचायतने घेऊन लागलीच त्या ठिकाणचा परिसर स्वच्छ करून त्या ठिकाणी ट्रॅक्टरची सोय केली. भाविकांना अनंत चतुर्दशीला या ठिकाणी प्लास्टिक वस्तू तसेच निर्माल्य आणि इतर सर्व वस्तू त्यात टाकण्यासंदर्भात बॅनर लावून जागृती करण्यात आली.

सह्याद्रीनगर, सारथीनगर, लक्ष्मीनगर, गणेशपूर, श्रीनाथनगर, आंबेवाडी, मण्णूर,जेल कॉलनी या परिसरातील भाविक गणपती विसर्जन करण्यात गर्दी करतात. याची दखल घेत या परिसरात अस्वच्छता होऊ नये म्हणून ग्राम पंचायत उपाध्यक्षा चेतना अगसगेकर, सदस्य रामचंद्र कुद्रेमनीकर, अशोक कांबळे व सफाई कामगार दिलीप भोसले, करण कुराडे, सोमू कुराडे व ग्रा. पं. शिपाई बाळू मास्ते या सर्वांनी  ट्रॉलीची सोय करून दिली. नव्या पुलावरून तसेच जुन्या पुलावरून गणपतीचे विसर्जन करण्यात आले. या व्यवस्थेमुळे भाविकांतून समाधान व्यक्त केले जात होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.