For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

दसरोत्सवासाठी अतिरिक्त 500 बसेसची व्यवस्था

10:43 AM Oct 18, 2023 IST | Tarun Bharat Portal
दसरोत्सवासाठी अतिरिक्त 500 बसेसची व्यवस्था

वायव्य परिवहन मंडळाची माहिती : व्होल्वो स्लिपर, राजहंस आदी 50 ऐशोआरामाच्या बसेस कार्यरत असणार

Advertisement

हुबळी : दसरोत्सवाला राज्य व परराज्यातील विविध ठिकाणांहून येणाऱ्या तसेच दसरोत्सव संपवून परत जाणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी अतिरिक्त 500 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे, असे वायव्य परिवहन मंडळाकडून कळविण्यात आले आहे. दि. 23 रोजी महानवमी, आयुध पूजा, दि. 24 रोजी विजयादशमी आहे. यानिमित्त येणाऱ्या नागरिकांसाठी बसव्यवस्था करण्यात येत आहे. दि. 20 व 21 रोजी बेंगळूर, मंगळूर, गोवा, महाराष्ट्र, पुणे यासह राज्यातील व शेजारील राज्यांमधून  येणाऱ्या नागरिकांसाठी अतिरिक्त बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दसरोत्सवाला येणाऱ्या प्रवाशांना सोयीचे व्हावे यासाठी दि. 20, 21 आणि 22 रोजी बेंगळूर, मंगळूर, पुणे, गोवा यासह हुबळी, धारवाड, गदग, बेळगाव, चिकोडी, कारवार, हावेरी, बागलकोट आदी ठिकाणांहून अतिरिक्त बसव्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच स्थानिक बसस्थानकावरून जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्या व एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाणाऱ्या नागरिकांसाठीही बसव्यवस्था करण्यात येत आहे. यासाठी व्होल्वो स्लिपर, राजहंस आदी 50 ऐशोआरामाच्या बसेस तसेच 200 वेगदूत वाहनांसह 250 पेक्षा अधिक बसेस कार्यरत असणार आहेत. दसरोत्सव संपवून पुन्हा परत गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी दि. 24 व 25 रोजी बेंगळूर, मंगळूर, गोवा, पुणे तसेच राज्यातील नागरिकांसाठी 250 पेक्षा अधिक बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

आगाऊ बुकिंग केल्यास सवलत

Advertisement

सवलतीच्या दरात आगाऊ बुकिंग करण्यासाठी परिवहन मंडळाच्या www.क्srtम्.ग्ह अथवा केएसआरटीसी मोबाईल अॅपवर सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. चार किंवा पाच तिकिटे बुकिंग केल्यास पाच टक्के सवलत देण्यात येत आहे. जायचे व यायचे तिकीट बुकिंग केल्यास 10 टक्के सवलत देण्यात येईल, असे परिवहन मंडळाकडून कळविले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.