महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भविष्य निर्वाह निधीची रक्कम त्वरित द्यावी

12:31 PM Jan 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेझा कामगारांचे पणजीत आंदोलन

Advertisement

पणजी : डिचोली येथील सेझा कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांनी पाटो-पणजी येथील भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयासमोर निदर्शने करीत भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) जोरदार मागणी केली. जून 2023 मध्ये सेसाच्या सुमारे 154 कामगारांना कंपनीने सेवेतून कमी केले आहे. या कामगारांच्या बँक खात्यात ग्रॅज्युटी व इतर थकबाकीची रक्कम जमा करण्यात आलेली आहे. परंतु गेली सात महिने पीएफच्या रक्कम मिळविण्यासाठी झगडावे लागत आहे. त्यामुळे या माजी कामगारांनी पणजीत पीएफ कार्यालयाजवळ एकत्र येत जोरदार निदर्शने केली. कंपनीचे अधिकारी जोपर्यंत पीएफ रक्कमेबाबतचे ठोस आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू, असा पवित्रा माजी कामगारांनी घेतला. यावेळी 100हून अधिक कामगार या ठिकाणी उपस्थित होते. ग्रॅज्युटी दिली, मात्र पीएफची रक्कम का प्रलंबित ठेवली जात आहे, असा सवालही त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला. ई-लिलावाअंतर्गत डिचोली येथील खनिज लीज वेदांताने घेतली. त्यानंतर सेसाच्या सुमारे 154 कामगारांना जून 2023 मध्ये कंपनीने सेवेतून कमी केले आहे. या कामगारांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यातील काही कामगारांचे वय उलटून गेले असल्याने अन्य ठिकाणी काम मिळणे मुश्कील झाले आहे, असे कामगारांनी सांगितले. त्यामुळे भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पीएफची रक्कम त्वरित द्यावी, अशी मागणी केली.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article