राज्याच्या महसुलावर परिणाम करणाऱ्या समस्यांचा ‘डाटा’ द्या
मुख्यमंत्री सावंत यांची जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत सूचना
पणजी : देशातील अनेक राज्यांना महसूल प्राप्तीबाबत अडचणी आहेत. काही गोष्टी परिणाम करणाऱ्या आहेत, अशी निवेदने काही राज्यांनी सादर केलेली आहेत. परंतु या समस्यांची ‘डाटा’ स्वऊपात माहिती दिल्यास त्यातील प्रत्येक मुद्यावर विचारविनिमय करून त्या सोडविण्यात येतील, त्यासाठी समस्यांचा अहवाल (डाटा) द्यावा, अशी सूचना जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत जीएसटी विभागाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. दिल्ली येथे झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या तिसऱ्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत मार्गदर्शन करीत होते. यावेळी गोव्यातून आदिवासी कल्याण खात्याचे सचिव सरप्रीत सिंग गिल व इतर राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जीएसटी कौन्सिलने स्थापन केलेल्या रिअल इस्टेट क्षेत्राला चालना देण्यासाठी नव्याने पुनर्गठीत मंत्री गटाच्या प्रतिनिधींनी विविध मुद्दे जीएसटी बैठकीत मांडले. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, जीएसटी बैठकीत रिअल इस्टेट क्षेत्राशी संबंधित विविध मुद्यांवर आणि देशातील विविध राज्य सरकारांच्या निवेदनांवर चर्चा करण्यात आलेली आहे.