महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून द्या

10:38 AM Jun 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पाण्याची गुणवत्ता तपासा : आमदार विठ्ठल हलगेकर यांची बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना

Advertisement

खानापूर : सर्व गावांतील पिण्याच्या पाण्याची चाचणी करूनच ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा, अशा सूचना आमदार विठ्ठल हलगेकर यांनी तालुका पंचायत सभागृहात सोमवारी जिल्हा पंचायत आणि ग्रामीण पेयजल व स्वच्छता विभाग तसेच तालुका पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रामीण पाणीपुरवठा कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केल्या. यावेळी तहसीलदार प्रकाश गायकवाड, ता. पं. कार्यनिर्वाहक अधिकारी विरनगौडर एगनगौडर, पाणीपुरवठा विभागाचे रमेश हेगडे व्यासपीठावर उपस्थित होते. तालुक्यातील सर्व ग्राम पंचायतींचे पीडीओ आणि विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

आमदार विठ्ठल हलगेकर पुढे म्हणाले, शहरासह ग्रामीण भागातील पाणीपुरवठा विभागाने दक्षता घेऊन पिण्याचे पाणी दूषित होणार नाही, यासाठी सर्व ती खबरदारी घेण्यात यावी, दूषित पाण्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होतात. यासाठी शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. तसेच अंगणवाडी तसेच शाळांमधून स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यात यावा, यासाठी अधिकाऱ्यांनी शाळा व अंगणवाड्यांना भेटी देवून पाहणी करावी, यासाठी ग्रा. पं. सदस्य आणि कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बोलताना ग्रामीण पेयजल व स्वच्छता विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता रमेश हेगडे म्हणाले, पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे विविध आजारांना आमंत्रण मिळते. यासाठी ग्राम पंचायतीने पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता व चाचणी करूनच पाणीपुरवठ्याचे व्यवस्थापन करावे.यावेळी ता. पं. कार्यकारी अधिकारी विरणगौडर एगनगौडर,तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनीही अधिकाऱ्यांना पाणीपुरवठा तसेच पावसाळ्यात पसरणाऱ्या विविध आजारासंबंधी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article