महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अगसगे प्राथमिक आरोग्य केंद्राला इमारत उपलब्ध करून द्या

11:09 AM Jul 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सामाजिक परिवर्तन संघटनेचे आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन

Advertisement

बेळगाव : अगसगे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत पूर्णपणे जीर्ण झाली आहे. त्यामुळे इमारत धोकादायक ठरविण्यात आली आहे. सदर इमारत जमीनदोस्त करून त्या ठिकाणी नवीन इमारत बांधून ग्रामस्थांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन भारतीय सामाजिक परिवर्तन संघटनेतर्फे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आले. अगसगे येथे नागरिकांच्या सोयीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहे. सदर इमारत उभारून अनेक वर्षे उलटल्याने ही इमारत आता जीर्ण झाली आहे. त्यामुळे त्याठिकाणी ऊग्णांना आरोग्य सुविधा पुरविणे अशक्मय झाले आहे. त्यामुळे आरोग्य खात्याकडून इमारत धोकादायक ठरवून त्याठिकाणी आरोग्य सुविधा देण्यास बंदी करण्यात आली आहे.

Advertisement

सध्या खासगी इमारतीमध्ये भाडेतत्त्वावर डॉक्टरांकडून ग्रामस्थांना आरोग्य सुविधा दिल्या जात आहेत. याठिकाणी दिवसभर उपचार दिले जातात. डॉक्टरांची सोय नसल्याने रात्रीच्यावेळी वैद्यकीय सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांना खासगी डॉक्टरांकडे उपचार घ्यावे लागत आहेत. गोरगरीब नागरिकांना ही खर्चिक बाब ठरत आहे. सरकारने जीर्ण झालेली इमारत जमिनीदोस्त करून त्याठिकाणी नवीन ऊग्णालयाची इमारत उभारावी. याबरोबरच त्याठिकाणी डॉक्टरांची नियुक्ती करून ग्रामस्थांना 24 तास वैद्यकीय उपचार घेण्यासाठी सोय करून देण्यात यावी. त्यामुळे अनेक गोरगरीब नागरिकांना याचा उपयोग होणार आहे. प्रत्येक नागरिकाला आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे सरकारचे आद्यकर्तव्य आहे. आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी सदर बाब लक्षात घेऊन तातडीने यावर निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे कार्यदर्शी कल्लाप्पा मेत्री, राजकमल मेत्री, यल्लाप्पा पुजारी आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article