महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सर्व गावांना पुरेशी बससेवा पुरवा

11:22 AM Sep 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

परिवहनच्या व्यवस्थापक संचालक प्रियांगा यांची सूचना

Advertisement

बेळगाव : वायव्य परिवहन मंडळाच्या व्यवस्थापक संचालक प्रियांगा एम. यांनी बुधवारी मध्यवर्ती बसस्थानक पास काऊंटर, विश्रांतीगृह आदी  कामकाज व व्यवस्थेची पाहणी केली. विविध गावांना पुरेशा बससुविधा पुरविण्याबरोबरच बसस्थानकावर स्वच्छतेवर भर देण्याची सूचना केली. प्रवाशांच्या सुरक्षेची कामे करण्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. सध्या विविध इमारतींचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामांची पाहणी करून सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी सुरू असलेली ही कामे उत्तम गुणवत्तेसह लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना कंत्राटदारांना केली. यावेळी स्मार्ट सिटीच्या व्यवस्थापक संचालक सय्यद आफ्रिनबानू बळ्ळारी व परिवहन मंडळाचे बेळगाव विभागातील अधिकारी उपस्थित होते. प्रियांगा एम. यांनी बेळगाव-1 परिवहन विभागाला भेट देऊन प्रवासी व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी वेळेत बसेस सोडण्याची सूचना केली. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांच्या तक्रारीही जाणून घेतल्या.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article