महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आमदार इव्हान डिसोजा यांच्याविरोधात निदर्शने

09:48 AM Aug 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

देशद्रोही गुन्हा दाखल करण्याची खानापूर तालुका भाजप युवा मोर्चाची मागणी

Advertisement

खानापूर : विधानपरिषद सदस्य इव्हान डिसोजा यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या विरोधात तीव्र शब्दात अपमान केला आहे. त्यांनी आपल्या वक्तव्यात जर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कारवाई करण्यास परवानगी दिल्यास आम्ही राज्यपालांच्या कार्यालयावर बांगलादेशात जसे घडले तशी कारवाई करू, असे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ खानापूर तालुका भाजप युवा मोर्चाच्यावतीने पंडित ओगले यांच्या नेतृत्वात सदर वक्तव्याचा निषेध करत आमदार इव्हान डिसोजा यांच्यावर देशद्रोही कलमांतर्गत गुन्हा दाखल करावा, अशा मागणीचे निवेदन खानापूर पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांना देण्यात आले.

Advertisement

आमदार इव्हान डिसोजा यांनी भाजपच्या पदयात्रेविरोधात अत्यंत तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर तसेच राज्यपाल गेहलोत यांच्यावर आक्षेप घेत देशद्रोही विधान केले आहे. बांगलादेशात जे घडले त्याचपद्धतीने राज्यपालांच्या कार्यालयावर घडवले जाईल, असे वक्तव्य केल्याने देशाच्या एकसंघतेला धोका निर्माण झाला आहे. यासाठी आमदार इव्हान डिसोजा यांच्यावर देशद्रोही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत खानापूर तालुका भाजप युवा मोर्चाच्यावतीने मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. यावेळी खानापूर भाजप तालुकाध्यक्ष संजय कुबल, राजू जांबोटकर, संदीप अंगडी, धनाजी देवलत्तकर, अनंत सावंत, संजय गुरव, राहूल आळवणी, भूषण ठोंबरे, वज्रेस शिंदे, अविनाश खानापुरी यासह भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article