For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

काँग्रेसची बँक खाती गोठवल्याप्रकरणी निषेध

12:02 PM Mar 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
काँग्रेसची बँक खाती गोठवल्याप्रकरणी निषेध

पणजी : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसची 11 बँक खाती गोठवण्याच्या भाजप सरकारच्या कृतीचा काँग्रेसने निषेध केला आहे. भाजपला आपला पराजय दिसू लागल्याने ते अलोकतांत्रिक मार्गांचा वापर करत असल्याचे काँग्रेस प्रदेशआध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले. काल शुक्रवारी पणजीतील काँग्रेस हाऊस येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत अमित पाटकर बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, खासदार फ्रान्सिस सार्दिन, आमदार कार्लूस फेरेरा, आमदार अॅल्टन डिकॉस्टा, रमाकांत खलप उपस्थित होते. अमित पाटकर म्हणाले की, 2018-19 या आर्थिक वर्षासाठी 210 कोटी ऊपयांच्या प्राप्तिकर प्रकरणी खाती गोठवण्यात आली आहेत. “आमची खाती गोठवून आणि जबरदस्तीने 115.32 कोटी काढून घेऊन भाजपने आमच्यावर अन्याय केला आहे. लोकांनी काँग्रेस पक्षाला दिलेल्या देणग्या लुटल्या गेल्या आहेत. निवडणूक जवळ आली आहे आणि प्रचारासाठी आमच्याकडे पैसे नाहीत, आम्हाला पुढे जाण्यापासून रोखण्याचा हा भाजपचा अजेंडा आहे. असेही पाटकर यांनी सांगितले. भाजपसह कोणताही राजकीय पक्ष आयकर भरत नाही, तरीही काँग्रेस पक्षाची 11 बँक खाती गोठवण्यात आली आहेत. खाती गोठवण्याच्या भाजपच्या कृतीचा आम्ही निषेध करतो. गेल्या आठवड्यात आम्हाला आयटी विभागाकडून आर्थिक वर्ष 1993-94 साठी नवीन नोटीस मिळाली, असेही पाटकर म्हणाले. भाजप लोकशाहीला संपवून टाकण्यासाठी सर्व यंत्रणांचा वापर करत आहे. आता निदान निवडणूक आयोगाने तरी हस्तक्षेप करावा. प्रसार माध्यमे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, यासाठी त्यांनी हे समजून घेतले पाहिजे. रोजगार, खाणकाम सुरू करणे, तसेच म्हादई आणि इतर मुद्यांवर भाजप अपयशी आहे. दोन्ही इंजिन्स निकामी झाली आहेत, असे युरी आलेमाव म्हणाले.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.