बेळगाव-बाची रस्ता चौपदरी करण्यासाठी सोमवारी रास्तारोको
हिंडलगा ग्रामपंचायतीला म. ए. समितीतर्फे निवेदन
वार्ताहर/हिंडलगा
बेळगाव-बाची या राज्य महामार्गाची झालेली दुऊस्ती ही निव्वळ धुळफेक झाली आहे. उत्तम प्रकारे या रस्त्याची दुऊस्ती झालेली नसल्याने पुन्हा तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती व युवा आघाडी म. ए. समितीतर्फे रास्तारोको केला जाणार आहे. या रस्त्याच्या दुऊस्ती संदर्भात विविध संघटनांनी तसेच पश्चिम भागातील ग्रामपंचायतद्वारे बांधकाम खात्याकडे विनवणी करून निवेदने दिली गेली. परंतु म्हणावे तशी दुऊस्ती झाली नसल्याने पुन्हा पश्चिम भागातील सर्व ग्रामपंचायत तसेच चार चाकी, दुचाकी व नागरिकातर्फे मधुरा हॉटेल’ या ठिकाणी रास्तारोको करण्याचा निर्णय घेतला आहे.
याकरिता हिंडलगा ग्रामपंचायतला तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी निवेदन देऊन अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व सदस्यांना रास्तारोकोत सहभागी होण्यासंदर्भात आवाहन करून केले. रायचूर-बाची हा रस्ता पूर्वीच मंजूर झाला असून बेळगाव हद्दीपर्यंत ऊंदीकरण झाले आहे. परंतु बेळगाव-बाची हा रस्ता अद्याप चार पदरी झाला नाही यासाठी हा रास्तारोको असल्याचे सांगितले. निवेदनाचा स्वीकार ग्रामपंचायत उपाध्यक्षा चेतना अगसगेकर, सदस्य रामचंद्र मनोळकर, डी. बी. पाटील, यल्लाप्पा काकतकर, रामचंद्र कुद्रेमणीकर व पंचायत विकास अधिकारी अश्विनी कुंदर यांनी केला. यावेळी म. ए. समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले, युवा आघाडी हिंडलगा अध्यक्ष विनायक पावशे, लक्ष्मण एस. होणगेकर, नागेश किल्लेकर, अनिल हेगडे, बेळगाव युवा आघाडी अध्यक्ष राजू किणेकर, कृषी पत्तीन संस्थेचे अध्यक्ष रमाकांत पावशे, संचालक प्रकाश बेळगुंदकर व इतर मान्यवर उपस्थित होते.