महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राजस्थानमधील ‘त्या’ घटनेचा सफाई कामगार संघटनेतर्फे निषेध

10:30 AM Jun 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : राजस्थानमधील सूरतगड जिल्ह्यातील झुंझनू येथील अनुसूचित जातीमधील तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. उत्तर भारतामध्ये मागासवर्गीयांवर अन्याय-अत्याचार सुरूच असून ते रोखण्यात यावेत. बळी गेलेल्या निष्पाप तरुणाला न्याय देण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. राजस्थान येथील निष्पाप तरुण रामेश्वर वाल्मिकी याचा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे.किरकोळ कारणातून खून करण्यात आला असून खून झालेल्या तरुणाला न्याय मिळवून द्यावा. उत्तर भारतामध्ये मागासवर्गीयांना अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन वागणूक दिली जाते. गरीब तरुणाच्या झालेल्या खुनामुळे त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर कुटुंबीयांचा आधार नाहीसा झाला आहे. सदर तरुणाच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.सदर भागातील मागासवर्गीयांना संरक्षण देण्यात यावे. सरकारने याची गंभीर दखल घेऊन अशा घटना रोखण्यास त्वरित कडक उपाययोजना राबवावी, अशी मागणी करत  निषेध करण्यात आला. यावेळी अध्यक्ष काशिराम चव्हाण, दीपक मेत्री, मुरली चव्हाण, श्रीनिवास तळवार, परशराम हरिजन, कल्लाप्पा चौगुले, रुबीन पेरिकी आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article