महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

खासगी आयटीआय प्राध्यापकांचे वेतनवाढीसाठी आंदोलन

10:04 AM Dec 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : राज्यातील खासगी आयटीआय कॉलेजना विद्यार्थीकेंद्रीत अनुदान न देता थेट प्राध्यापकांना पगारासाठीचे अनुदान द्यावे, या मागणीसाठी राज्य खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था व  संघातर्फे राज्य सरकारला निवेदन सादर करण्यात आले. उत्तर कर्नाटकातील खासगी आयटीआय कॉलेजचे शिक्षक मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. खासगी आयटीआय कॉलेजमध्ये सर्वसामान्यांची मुले शिक्षण घेत आहेत. त्यांनी दिलेल्या शैक्षणिक फीमधून सरकार सरकारी आयटीआय कॉलेजच्या प्राध्यापकांच्या पगाराची सोय करीत आहे. असे असताना खासगी आयटीआय कॉलेजमधील शिक्षक मात्र तुटपुंज्या पगारावर काम करीत आहेत. मागील 20 वषर्पांसून वेतनवाढीसाठी आंदोलन करण्यात येत असले तरी राज्य सरकारने अद्याप वेतनवाढीचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. राज्यातील 413 खासगी आयटीआय कॉलेजमधील शिक्षकांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याने राज्य सरकारने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मागण्या मान्य न झाल्यास यापुढील काळात उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये संघटनेचे अध्यक्ष एस. एम. नेरबेंची, टी. आर. सत्यारे•ाr, जे. एस. नरगुंद, ए. वाय. लगमप्पगोळ यासह इतर उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article