Satara News : न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर हल्ल्याच्या प्रयत्नाचा साताऱ्यात निषेध !
साताऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर RPI चा तीव्र निषेध आंदोलन
सातारा : भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर सुनावणीदरम्यान झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नानंतर देशभरातून संताप व्यक्त होत आहे.
साताऱ्यात आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गटाच्या वतीने) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निषेध नोंदवण्यात आला. जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांनी यावेळी आरोप केला की, देशात जाती-जातीत तेढ निर्माण करून दंगल घडवण्याचा प्रयत्न होत असून अशा प्रवृत्तींना आळा घालणे आवश्यक आहे.
या निषेध आंदोलनादरम्यान जोरदार घोषणा देण्यात आल्या असून, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.न्यायव्यवस्था ही देशाचा कणा असून, तिच्यावर होणारे कुठलेही हल्ले सहन केले जाणार नाहीत, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाने दिला आहे.