कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ऊस दराच्या घोषणेसाठी हारुगेरीत 10 पासून आंदोलन

12:45 PM Oct 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कर्नाटक राज्य रयत संघ-हसिरू सेनेचा पुढाकार : गळीत हंगाम 1 नोव्हेंबरनंतर

Advertisement

बेळगाव : यंदा राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम 1 नोव्हेंबरनंतर सुरू केला जाणार आहे. याबाबतचा आदेश सरकारने जारी केला असून, जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाचा दर प्रतिटन 5500 रुपये (कारखान्यांकडून 3500 आणि सरकारकडून 2000) इतका देण्यात यावा, या मागणीसाठी शुक्रवार दि. 10 ऑक्टोबर रोजी कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसिरू सेनेतर्फे हारुगेरी क्रॉस येथे आंदोलन छेडण्यात येणार आहे, अशी माहिती शेतकरी नेते प्रकाश नाईक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Advertisement

बुधवारी कन्नड साहित्य भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सरकारच्या आदेशानुसार 1 नोव्हेंबरनंतर जिल्ह्यातील सर्व कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू करण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केला आहे. मात्र अद्यापही कोणत्याही कारखान्याने प्रतीटनाचा उसाचा दर जाहीर केलेला नाही. याच कारणासाठी शुक्रवार दि. 10 ऑक्टोबरपासून रायबाग तालुक्यातील हारुगेरी क्रॉस येथे हजारोंच्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरून उसाचा दर निश्चित करण्यासंदर्भात आंदोलन करणार आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांना निमंत्रण

आतापर्यंत सरकार आणि साखर कारखान्यांच्या मालकांकडून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. उसाला उतारा मिळत नसल्याने 1 नोव्हेंबरपर्यंत गळीत हंगाम सुरू केला जाऊ नये, अशी शेतकऱ्यांची मागणी असते. कारण यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. याची सरकारने दखल घेत सर्वप्रथम कारखान्यांनी उसाचा प्रतीटन दर जाहीर करावा. त्याचप्रमाणे शेतकरी नेते आणि शेतकरी सुमारे 30 कारखान्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनादेखील सदर बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. सरकारच्यावतीने ऊस दराची घोषणा करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसिरू सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article