महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नवीन इमारतांवर मराठी फलक न लावल्यास आंदोलन

10:47 AM Jul 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

इमारतींच्या लोकार्पणापूर्वी फलक लावण्याची म. ए. समितीची निवेदनाद्वारे मागणी

Advertisement

खानापूर : शहरात नव्याने बांधण्यात आलेल्या शासकीय इमारतीवर गुऊवार दि. 11 जुलैपर्यंत मराठीत फलक न लावल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र एकीकरण समितीने दिला आहे. तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक येथील शिवस्मारक शिवस्मारकात झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई होते. दळवी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. बैठकीत पदाधिकाऱ्यांनी विचार मांडल्यानंतर शहरातील शासकीय कार्यालयावर मराठीत फलक लावण्यात आला नाही.

Advertisement

तसेच नव्याने बांधण्यात आलेले बसस्थानक, दवाखाना आणि हेस्कॉम कार्यालयावर मराठीत फलक लावण्यात आले नाहीत. सदर ठिकाणी मराठीत फलक लावण्यात यावेत याबाबतचे निवेदन मे महिन्यात यापूर्वी देण्यात आले होते. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. शुक्रवार दि. 12 रोजी नवीन इमारतींचे लोकार्पण होणार आहे त्यापूर्वी या सर्व आस्थापनावर मराठीत फलक लावण्यात यावेत अन्यथा उग्र आंदोलनाचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तशा आशयाचे निवेदन तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शंकर पाटील, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, रणजीत पाटील, शिवाजी पाटील, आर. एस. पाटील, निरंजन देसाई यासह समितीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article