महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उद्घाटनापूर्वी मराठी फलक न लावल्यास आंदोलन

10:54 AM Sep 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बैठकीत म. ए. समितीचा इशारा

Advertisement

खानापूर : माता-शिशू रुग्णालयत, बसस्थानक आणि हेस्कॉम कार्यालयाववर उद्घाटनापूर्वी मराठी फलक न लावल्यास आंदोलनाचा निर्णय म. ए. समितीच्या सोमवारी येथील शिवस्मारकात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी गोपाळ देसाई होते. सचिव आबासाहेब दळवी यांनी उपस्थितांचे स्वागत करुन बैठकीचा उद्देश स्पष्ट करून मराठीतून फलक लावण्यासंदर्भात निर्णय घेण्यात यावा, असे आवाहन केले. यानंतर झालेल्या चर्चेत आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला.खानापूर येथील शिशू-माता रुग्णालय, बसस्थानक, हेस्कॉम कार्यालय यासह इतर शासकीय कार्यालयावर मराठी फलक लावावेत, अशी मागणी म. ए. समितीकडून करण्यात आली होती.

Advertisement

याबाबत जिल्हाधिकारी तसेच संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली होती. तसेच आमदार विठ्ठल हलगेकर यांची भेट घेऊन मराठीत फलक लावण्याची मागणी केली होती. मात्र मराठीत फलक न लावता या कार्यालयाचे आणि दवाखान्याचा उद्घाटन कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने उद्घाटनापूर्वी मराठीतून फलक न लावल्यास उद्घाटनादिवशी आंदोलनाचा निर्णय म. ए. समितीच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीत मारुती परमेकर, विलास बेळगावकर, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, रमेश धबाले यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी संजू पाटील, बळीराम देसाई, शिवाजी पाटील, पुंडलिक पाटील, नाना घाडी, विलास देसाई, नारायण पाटील, बी. बी. पाटील, मोहन गुरव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article