लडाखमध्ये विस्तारित शस्त्रागाराचा प्रस्ताव
पर्यावरण मंत्रालयाच्या मंजुरीची प्रतीक्षा : संरक्षण दलाकडून सतर्क राहण्याचे प्रयत्न सुरूच
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संरक्षण मंत्रालय लष्करी ताकद वाढवण्यासाठी लडाखमध्ये अधिक शस्त्रास्त्र-दाऊगोळा साठवण जागा (शस्त्रागार) तयार करण्याची तयारी करत आहे. या शस्त्रागारामुळे या भागात तैनात लष्करी तुकड्यांना परिस्थितीनुरूप दारूगोळा उपलब्ध करण्याचा विचार आहे. विशेषत: चीनच्या सीमेला लागून असलेल्या पूर्व लडाखच्या भागांसाठी ही योजना बनवली जात आहे. या भागात गलवान व्हॅलीचाही समावेश असून तेथे 2020 मध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता.
भारत आणि चीन यांच्यामध्ये सीमारेषेवरून सुरू असलेला तणाव सद्यस्थितीत मावळलेला असला तरी भारत सुसज्जतेच्या बाबतीत सतर्क राहण्यावर अधिकाधिक काम करत आहे. त्याचनुसार सुरक्षा दलांनी लडाखमध्ये दारूगोळा साठा वाढवण्याव्यतिरिक्त लुकुंगमध्ये त्यांची उपस्थिती मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रस्ताव पाठवले आहेत. लुकुंग हे पँगाँग त्सो तलावाच्या काठावर वसलेले गाव आहे. याशिवाय दुरबुक भागातही सुरक्षा दलांची उपस्थिती वाढवण्याची योजना आहे. एप्रिल ते जुलै 2023 दरम्यान पाठवलेले हे प्रस्ताव पर्यावरण मंत्रालयाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. या प्रस्तावांवर पर्यावरण मंत्रालयानी हिरवा कंदील दाखविण्याची आवश्यकता आहे.
सुरक्षा दलांची विशेष योजना
लडाखच्या पुढील भागात, विशेषत: कारवाईच्या सुऊवातीच्या टप्प्यात लढाऊ उपकरणे असणे खूप महत्वाचे आहे, असे संरक्षण दलाचे म्हणणे आहे. त्यानुसार पाठवलेल्या प्रस्तावांमध्ये हॅनले आणि फोटी ला जवळील मोक्मयाच्या ठिकाणी फॉर्मेशन अॅम्युनिशन स्टोरेज पॅसिलिटी (एफएएसएफ) स्थापन करणे समाविष्ट आहे.
भूमिगत गुहा बांधण्याचीही योजना
याशिवाय इतर मोक्मयाच्या ठिकाणी भूमिगत गुहा बांधण्याचीही योजना आहे. याच भागात सध्या लष्करी तुकड्या तैनात आहेत. विशेषत: पूर्व लडाखमधील हानले, पुंगुक, फोटी ला आणि कोयुल सारख्या फॉरवर्ड भागात ही निर्मिती केली जाणार आहे. सध्या येथे बहुतांश दारूगोळा तात्पुरत्या स्वरूपात साठवला जातो. हा शस्त्रसाठा हानलेपासून सुमारे 250 किलोमीटर आणि फोटी लापासून सुमारे 300 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे अचानक गरज भासल्यास पुरवठ्यात अडथळे येतात. मात्र, फॉर्मेशन अॅम्युनिशन स्टोरेज पॅसिलिटी (एफएएसएफ) तयार केल्याने शस्त्रागाराचा गंभीर प्रश्न सुटेल असा विश्वास संरक्षण दलाला आहे.