सौंदत्ती यल्लम्मा देवस्थानच्या विकासासाठी केंद्राकडे प्रस्ताव
110 कोटींचा प्रस्ताव : खासदार शेट्टर यांच्याकडून पाठपुरावा
बेळगाव : सौंदत्ती येथील यल्लम्मा मंदिर परिसरात केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती खासदार जगदीश शेट्टर यांनी नुकतीच घेतली. बेळगाव पर्यटन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रकल्पांबाबत माहिती त्यांनी जाणून घेतली. केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्यावतीने ‘प्रसाद या योजनेतर्गंत 11 कोटी रुपये अनुदान मंजूर करण्यात आले असून जिल्हा प्रशासनाकडून केंद्र सरकारकडे डीपीआर सादर करण्यात आला आहे. येत्या काही दिवसात केंद्रीय मंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मंजुरीसाठी विनंती केली जाणार आहे. याबरोबरच मंदिर परिसरात अन्य विकासकामांबाबत अंदाजे 110 कोटी रुपयांच्या अनुदानाचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविला आहे. तो देखील लवकरच मंजूर होईल, असा विश्वास शेट्टर यांनी व्यक्त केला. यावेळी पर्यटन विभागाच्या सहसंचालक सौम्या भापता, श्रीक्षेत्र रेणुका यल्लम्मा पर्यटन विकास मंडळाच्या आयुक्त गीता कौलगी यांच्यासह इतर उपस्थित होते.