For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

1500 बांधकाम कामगारांचे प्रस्ताव मंजूर

04:21 PM Jan 18, 2024 IST | अनुजा कुडतरकर
1500 बांधकाम कामगारांचे प्रस्ताव मंजूर

प्रसाद गावडे ; स्वाभिमानी संघटनेच्या पाठपुराव्याला यश

Advertisement

सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी

स्वाभिमानी कामगार संघटनेच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील 1500 बांधकाम कामगारांचे विविध योजनांचे प्रस्ताव मंडळाकडून मंजूर करण्यात आले आहेत. जवळपास अडीज कोटी रुपयांची लाभ रक्कम बांधकाम कामगारांच्या खाती जमा होणार आहे. अशी माहिती स्वाभिमानी कामगार संघ सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिली.महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीकृत बांधकाम कामगारांना विविध योजना शासनाकडून अंमलात आहेत. जिल्ह्यातील बांधकाम कामगारांचे चालू शैक्षणिक वर्षातील 2215 लाभाचे प्रस्ताव मागील सहा महिन्यांहून अधिक काळ मंजुरीविना प्रलंबित होते.स्वाभिमानी कामगार संघटनेने याबाबत वारंवार मंडळ स्तरावर पाठपुरवा करत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला होता.बांधकाम कामगार मंडळ प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेऊन जिल्ह्यातील सुमारे 1529 कामगारांचे लाभाचे प्रस्ताव मंजूर करत जवळपास 2 कोटी 30 लाख रुपये एवढी लाभ रक्कम कामगारांच्या खात्यावर जमा केली आहे. उर्वरित कामगारांचे प्रस्ताव त्रुटींमुळे प्रलंबित राहिले असून त्यांचा ही पाठपुरावा संघटनेच्या माध्यमातून केला जाणार आहे.जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी मंडळाच्या विविध योजनांची व त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची परिपूर्ण माहिती घेऊन जास्तीत जास्त योजनांचा लाभ मिळवून घ्यावा असे आवाहन स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
×

.